कऱ्हाड ः ५ वाहनांवर कारवाई

कऱ्हाड ः ५ वाहनांवर कारवाई
Published on: 

कऱ्हाडात बेशिस्त वाहनांवर कारवाई

वाहतूक शाखेची विशेष मोहीम; ब्लॅक फिल्मिंग, मॉडिफाइड सायलेन्सर, प्रेशर हॉर्न व फॅन्सी नंबरप्लेट

कऱ्हाड, ता. २५ ः शहरातील वाहतूक नियमन प्रभावीपणे राबविणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करणे तसेच रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने नियमबाह्य उपकरणांचा वापर रोखण्यासाठी कऱ्हाड शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून आज दिवसभर विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान ब्लॅक फिल्मिंग, मॉडिफाइड सायलेन्सर, प्रेशर हॉर्न व फॅन्सी नंबरप्लेट वापरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली.
या कारवाईत पाच वाहनांवरील ब्लॅक फिल्म काढण्यात आली, तसेच तीन मॉडिफाइड सायलेन्सर, सात फॅन्सी नंबरप्लेट आणि तीन प्रेशर हॉर्न जप्त करण्यात आले. दरम्यान, रात्रीच्या वेळी कोल्हापूर नाका, कार्वे नाका आणि कृष्णा कॅनॉल या ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. या कारवाईमध्ये मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध ड्रिंक ॲण्ड ड्राइव्हच्या सात केसेस नोंदविण्यात आल्या, तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध सहा केसेस करण्यात आल्या.
पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर, उपअधीक्षक राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे, पोलिस उपनिरीक्षक संतोष जगदाळे व राजेंद्र घाडगे, पोलिस हवालदार अमोल पवार, सत्यजित नेवसे, संदीप घोरपडे, जयवंत गोसावी, अश्विनी सूर्यवंशी, तृप्ती वीर तसेच पोलिस शिपाई प्रशांत मोहिते आणि शिवानंदन नारायणी यांनी कारवाईत सहभाग घेतला.
---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com