होम मिनिस्टर स्पर्धेत कोमल पाटील यांनी मारली बाजी

होम मिनिस्टर स्पर्धेत कोमल पाटील यांनी मारली बाजी
Published on: 

KRK26B04079
करकंब (ता. पंढरपूर) : करकंब फेस्टिव्हलमधील होम मिनिस्टर स्पर्धेत यशस्वी झालेल्या महिलांसह निवेदक नाना बारामतीकर.
---
कोमल पाटील ठरल्या ‘होम मिनिस्टर’
करकंब फेस्टिव्हलमधील कार्यक्रमात दीडशे महिलांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
करकंब, ता. १५ : करकंब फेस्टिव्हलमध्ये आयोजित अटीतटीच्या होम मिनिस्टर स्पर्धेत कोमल पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला. मोनल शाह, दीपाली जाधव, हर्षदा भोसले आणि अश्विनी रेडे यांनी अनुक्रमे द्वितीय ते पाचवा क्रमांक मिळविला.
या स्पर्धेत १५० महिलांनी सहभाग नोंदविला. निवेदक नाना बारामतीकर यांनी विविध खेळ, उखाणे आणि नृत्याच्या माध्यमातून कार्यक्रमात रंगत आणली. पहिल्या दोन विजेत्यांना पैठणी व भेटवस्तू, तर अन्य तीन विजेत्यांना साडी, नथ आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू देण्यात आल्या. उपस्थित महिलांसाठी चिठ्ठीद्वारे सचिन हराळे यांच्या वतीने २५, तर फिरोज प्लंबिंगच्या वतीने १५ बक्षिसे देण्यात आली.
चेअरमन सचिन हराळे आणि नाना बारामतीकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‌घाटन झाले. यावेळी फेस्टिव्हलचे अध्यक्ष लक्ष्मण जाधव, उपाध्यक्ष सचिन शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, शुक्रवारी (१३) सकाळी महादेव मंदिरात आयोजित रांगोळी स्पर्धेत ६३ महिलांनी सहभाग घेतला. इंजिनिअर अशोकसिंह देशमुख आणि अल्ताफ कोरबू यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. महिलांनी रांगोळ्यांतून विविध सामाजिक प्रश्न मांडण्याबरोबरच शुभसंदेशही दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.