कंदरीत चौथा बिबट्या जेरबंद

कंदरीत चौथा बिबट्या जेरबंद
Published on: 

शिक्रापूर, ता.१७ : करंदी (ता. शिरूर) परिसरात गेल्या काही दिवसांपासून दहशत माजविणारा पूर्ण वाढ झालेला बिबट्या शुक्रवारी (ता. १६) रात्री वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. गेल्या वर्षभरात या भागातून पकडलेला हा चौथा बिबट्या आहे. त्याची रवानगी माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात करण्यात आली आहे.
करंदी परिसरातील वाड्या-वस्त्यांवर शेतकऱ्यांना वारंवार बिबट्याचे दर्शन होत होते, तसेच पशुधनावरही हल्ले वाढले होते. या पार्श्वभूमीवर, शिरूर वनविभागाने तळेगाव रोडवरील पांडुरंग ढोकले यांच्या शेतात दोन दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता. गणेश दरेकर हे शुक्रवारी (ता.१७) रात्री शेताकडे जात असताना त्यांना पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याचे दिसले. त्यांनी तातडीने वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांना माहिती दिली.
वनपरीमंडळ अधिकारी रूपावली जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नियतक्षेत्र वनअधिकारी सोपान अनासुने, रेस्क्यू टीमचे शेरखान शेख, अमोल कुसाळकर, श्रीकांत भाडळे, गणेश टिळेकर, वैभव निकाळजे, राहुल गायकवाड, आपदा मित्र महेश साबळे, परमेश्वर दहीरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. माजी उपसरपंच पांडुरंग ढोकले, पोलिस पाटील वंदना साबळे, बापू दरेकर, किरण ढोकले, जालिंदर दरेकर, अजित दरेकर, पंडित ढोकले, अमित ढोकले, संदीप दरेकर, ओंकार ढोकले यांच्या उपस्थितीत बिबट्याला ताब्यात घेण्यात आले.

ऊस क्षेत्र मोठे असल्याने करंदीची ओळख बिबटप्रवण क्षेत्र म्हणून झाली आहे. शेतकऱ्यांना वारंवार बिबट्याचे दर्शन होते. वनखात्याने करंदीसाठी एक पिंजरा कायमस्वरूपी गावात ठेवावा, जेणेकरून गरजेनुसार तो लावता येईल आणि गाव बिबटमुक्त करता येईल.
- प्रवीण राजाभाऊ ढोकले, अध्यक्ष, युवक राष्ट्रवादी, आंबेगाव-शिरूर

05665

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com