
शिरूर, ता. २३ : पुणे- अहिल्यानगर महामार्गावरील कारेगाव (ता. शिरूर) येथे सोमवारी (ता. २३) सकाळी साडे आठच्या सुमारास सिमेंट उतरवण्यासाठी आलेला ट्रक मागे घेत असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात अडकून रस्त्यावर आडवा झाला. याच दरम्यान रांजणगाव गणपतीकडून येणारी शाळेची बसही बंद पडली. त्यामुळे तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे दिवसभर वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.