Kargil Vijay Diwas : बारामतीत कारगीलच्या हुतात्म्यांना आदरांजली

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 July 2020

शहरातील भिगवण चौकातील हुतात्मा स्तंभास अभिवादन करण्यात आले व भारत माता की जय, वीर जवान अमर रहे आदी घोषणा देऊन राष्ट्रगीत झाले.

बारामती :  कारगील युध्दातील हुतात्मा जवानांना आज बारामतीत अभिवादन केले गेले. येथील  बारामती तालुका जय जवान आजी माजी सैनिक संघटना यांच्या वतीने कारगील युद्धातील हुतात्मा जवानांना आज अभिवादन केले गेले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

शहरातील भिगवण चौकातील हुतात्मा स्तंभास अभिवादन करण्यात आले व भारत माता की जय, वीर जवान अमर रहे आदी घोषणा देऊन राष्ट्रगीत झाले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष हनुमंत निंबाळकर यांच्यासह शहर व तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

"युद्ध होऊन जातात, भूप्रदेश जिंकले किंवा हरले जातात. काही जणांचा वरचष्मा होतो तर काहींची उचलबांगडी होते. आपल्या देशाचे प्राणपणानं रक्षण करण्यासाठी मृत्यूलाही हसत हसत सामोरे जाणारे जवान, ज्यांच्या शौर्याचे वर्णन केवळ शब्दांत कुणी मांडूच शकत नाही. देशासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणाऱ्या त्या वीरांना सलाम, आणि कधीही या वीरांच्या कर्तव्याच्या आड न येणाऱ्या त्यांच्या परिवाराला देखील सलाम.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यात वाईट फक्त याचं गोष्टीचे वाटते की आपल्याला या जवानांच्या बलिदानाची जाणीव होण्यासाठी एखादा दिवस असू नये, ही जाणीव कायमची असावी ही अपेक्षा आहे " असे प्रतिपादन हनुमंत निंबाळकर यांनी केले. सचिव राहुल भोईटे यांनी आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kargil Vijay Diwas Tribute to the martyrs of Kargil in Baramati