Karha river Baramati new tourist center
Karha river Baramati new tourist centersakal

बारामतीतील कऱ्हा नदी होणार पर्यटनाचे नवीन केंद्र...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कऱ्हा नदी सुधार प्रकल्प राबविला
Published on

बारामती : शहरातून वाहणा-या कऱ्हा नदीचे (Karha river)रुप वेगाने बदलत असून लवकरच बारामतीची क-हा नदी हे पर्यटनाचे केंद्र बनणार आहे. नागरिकांसाठी दैनंदिन व्यायाम व एक विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून कऱ्हा नदीकाठ भविष्यात ओळखला जाईल.

Karha river Baramati new tourist center
रश्मी शुक्लांची तब्बल 6 तास चौकशी, आता नांगरे पाटलांचा जबाब

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही महिन्यात अत्यंत वेगाने क-हा नदी सुधार प्रकल्प राबविला जात आहे. नदीकाठ हा नयनरम्य असावा आणि नदीच्या दोन्ही बाजूंनी नागरिकांना सकाळी व संध्याकाळी फिरता यावे, दोन्ही बाजूंना एकसारखी लावलेली झाडे असावीत अशा संकल्पना नजरेसमोर ठेवून अजित पवार यांनी हा प्रकल्प साकारण्यासाठी कंबर कसली आहे, अशी माहिती बारामती नगरपालिकेचे गटनेते सचिन सातव यांनी दिली.

बारामतीनजिक खंडोबानगर ते मळद या पाच कि.मी. अंतरासाठी हा नदीसुधार प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या मध्ये नदीकिनारी सायकल ट्रॅक व वॉकींग ट्रॅकही विकसीत करण्यात येणार आहे. क-हा नदी ही बारमाही प्रवाही नाही, त्या मुळे शहर परिसरात पाणी असावे या उद्देशाने खंडोबानगर, दशक्रिया विधी घाट, कत्तलखान्यानजिक, देवळे इस्टेट व मळद पूलानजिक पाच छोटे बंधारे घालण्यात येणार आहेत.

Karha river Baramati new tourist center
Pune Building Collapse: इमारत कोसळल्याप्रकरणी चौघांना अटक

सांडपाणी प्रक्रीया प्रकल्पाचे शुध्द केलेले जवळपास 25 लाख लिटर पाणी दररोज नदीत पुन्हा सोडले जाणार असून त्या मुळे नदीपात्रात कायमस्वरुपी पाणी राहिल, अशी व्यवस्था होईल. या शिवाय दशक्रिया विधी घाट ते कसबा यांना जोडणारा एक सुंदर पूल उभारला जाणार आहे. या पूलावर उभे राहून लोक नदीचे विहंगम दृश्य पाहू शकतील. या पूलावरुन वाहतूक होणार नाही तर फक्त लोकांना ये जा करण्यासाठी हा पूल असेल.

कऱ्हा नदी होईल आकर्षणाचे केंद्र.....

नदीच्या बाजूला सुंदर लँडस्केपिंग केले जाणार असून आबालवृध्दांना काही क्षण येथे निवांतपणे बसता येईल. काही ठिकाणी सीटआऊट असतील. नदीला येणा-या पूरामुळे नुकसान होऊ नये या साठी गॅबियन वॉलची निर्मिती करण्यात आली असून दोन्ही बाजूंना पुराचे पाणी शहरात येऊ नये या साठी रिटेनिंग वॉलचीही निर्मिती करण्यात आली आहे. या मुळे पूराचा धोका अजून कमी होणार असून नदीचा प्रवाह अधिक वाहता राहिल.

– सचिन सातव, गटनेते, बा.न.प.

Karha river Baramati new tourist center
कात्रज-गोकुळनगर : मनसे-भाजपचे राष्ट्रवादीला आव्हान

नदीसुधार प्रकल्पाचा बारामती पॅटर्न.....

या प्रकल्पासाठी उभारण्यात येणा-या गॅबियन वॉलसाठी वापरलेला दगड हा बारामतीतील नव्याने होत असलेल्या साठवण तलावातून काढण्यात आला आहे. एकीकडे साठवण तलाव उभारणी व तेथून निघालेल्या दगडातून नदीपात्रात गॅबियन वॉलची निर्मीती झाल्याने बारामती नगरपालिकेची कोट्यवधी रुपयांची दुहेरी बचत झाली आहे.

दृष्टीक्षेपात कऱ्हा नदी सुधार प्रकल्प....

• खंडोबानगर ते मळद दोन्ही काठ मिळून पाच कि.मी. पहिला टप्पा

• 450 ते 600 मि.मी. व्यासाच्या पाईपलाईनमधून सांडपाणी वाहून नेणार

• गॅबियन भिंती बांधून त्यावर जॉगिंग, वॉकींग ट्रॅक व सुशोभिकरण

• विविध ठिकाणी चौपाटी, उद्यान, विरंगुळा केंद्र उभारणी होणार

• नदीपात्रात बोटींग व आकर्षक फूट ब्रिज उभारणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com