कऱ्हाड ७० रणरागिणींचा रात्रभर घुमला संगीताचा सूर

कऱ्हाड ७० रणरागिणींचा रात्रभर घुमला संगीताचा सूर
Published on: 

कऱ्हाडच्या ७० रणरागिणींकडून
सलग चोवीस तास संगीताचा सूर

कार्यक्रमांची लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद

कऱ्हाड, ता. ८ ः येथील तब्बल ७० महिला कलाकारांनी सलग २४ चोवीस तास कराओके गायनातून ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना त्यांच्याच गीतांतून आदरांजली वाहिली. त्यांच्या या अभूतपूर्व उपक्रमाची लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. जयश्री भागवत, धनश्री रोकडे यांनी त्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमानिमित्त येथील सुरेल रणरागिणींनी सांस्कृतिक पटलावर कर्तृत्वाचा झेंडा फडकावला.

बी. आर. क्रिएशनच्या महिला कराओके मंचातर्फे येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनात या विक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. सायंकाळी सातच्या सुमारास सुरू झालेली सुरांची मैफील रात्रभर, पहाटे आणि दुसऱ्या दिवशीच्या सायंकाळी सातपर्यंत चालली. घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून पहाटेही व्यासपीठावर पूर्ण ताकदीने गाणाऱ्या महिलांचा आत्मविश्वास उपस्थितांचे डोळे दिपवणारा होता. रसिकांची दाद आणि कुटुंबीयांचे प्रोत्साहनाच्या जोरावर येथील ७० महिलांनी आशा भाेसलेंची भावगीते, भक्तिगीते, शास्त्रीय आणि द्रुत लयीतील गाणी अत्यंत तन्मयतेने सादर करून रसिकांना खिळवून ठेवले. यापूर्वी एक मार्चला या मंचाने ५१ महिलांच्या साथीने सलग १५ तास लावणी कराओकेचा विक्रम रचून विविध आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन शिल्पा कुलकर्णी, वृषाली पाटणकर, योगिनी देशपांडे, प्राची चिपळूणकर, रोहिणी सोनटक्के यांनी केले. त्यामुळे कार्यक्रम शिस्तबद्धरीत्या झाला. महिलांच्या या यशाचे जिल्ह्यातून कौतुक होत आहे.


W56171
कऱ्हाड ः कऱ्हाडच्या सुमारे ७० महिला कलाकारांनी सलग चोवीस तास कराओके गायनातून गायिका आशा भोसले यांच्या गीतांद्वारे त्यांना आदरांजली वाहिली.
.......................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com