कोपर्डे हवेली : पोदार सायक्लोथाॅनने दिला रस्ता सुरक्षेचा संदेश

कोपर्डे हवेली : पोदार सायक्लोथाॅनने दिला रस्ता सुरक्षेचा संदेश

Published on

कऱ्हाडमध्ये सायकल रॅलीस प्रतिसाद

पोदार स्कूल, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, रोटरी क्लबकडून आयोजन

कऱ्हाड, ता. १६ : राज्य क्रीडा दिन, ऑलिंपिक विजेते खाशाबा जाधव यांची जयंती, राष्ट्रीय रस्ता सुरक्षा माह आणि सेना दिन यानिमित्त येथे ‘पोदार सायक्लोथॉन’चे आयोजन करण्यात आले. पोदार इंटरनॅशनल स्कूल, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि रोटरी क्लब ऑफ कऱ्हाड यांच्या वतीने घेतलेल्या सायकल रॅलीस मोठा प्रतिसाद मिळाला.
वाहतूक सुरक्षा, पर्यावरण संवर्धन आणि शारीरिक तंदुरुस्तीबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. काल सकाळी साडेसात वाजता कार्वे नाका येथे मोटार वाहन निरीक्षक चैतन्य कणसे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक शीतल घाडगे, रोटरी क्लबचे अध्यक्ष शेखर कोगनुळकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली. रॅली भेदा चौक, शाहू चौक, दत्त चौक, यशवंत हायस्कूल, आझाद चौक, चावडी चौक, कन्या शाळा, कृष्णा नाका, कॅनॉल, बनवडी फाटामार्गे पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे पोहोचली. शाळेतील विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
रॅलीनंतर शाळा परिसरात झुंबा घेण्यात आला. श्री. कणसे यांनी ‘माझ्यापासून सुरुवात’ हा संकल्प करून सुरक्षित वाहन संस्कृतीचा कऱ्हाड पॅटर्न निर्माण करण्याचे आवाहन केले.
उपप्राचार्या स्वाती नांगरे यांनी सहभागींचे अभिनंदन केले. प्राचार्य अन्वय चिकाटे यांनी सायकलिंगमुळे कार्बन उत्सर्जन कमी होत असून, पर्यावरण व रस्ता सुरक्षेची जागरूकता हाच उद्देश असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमासाठी प्रशासकीय अधिकारी विशाल जाधव, कार्यक्रम समन्वयिका मेघा पवार, क्रीडा समन्वयक अमोल पालेकर यांच्यासह शिक्षक, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


फोटो ओळ :
26B02321, 26B02322
कऱ्हाड ः रस्ते सुरक्षा संदेश देताना मोटार वाहन व रोटरी क्लबचे पदाधिकारी व मान्यवर.
(जयंत पाटील : सकाळ छायाचित्रसेवा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com