विंग. आणे येथील वांग्यावरील बंधाऱ्यातील भोगीचे पाणी देसाई मळ्याकडे जाणारा रस्त्यावर उतरल्याने गैरसोय
आणेत बंधाऱ्याच्या फुगीचे पाणी रस्त्यावर
ऊस वाहतुकीचा प्रश्न; शेतकरी वैतागले, आंदोलनाचा पवित्रा
विंग/कोळे, ता. २० ः वांग नदीवरील पाणी साठवण बंधाऱ्यातील पाण्याच्या फुगीमुळे आणे (ता. कऱ्हाड) येथील देसाई मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आले आहे. गेल्या १५ दिवसांपासून ही स्थिती आहे. त्यामुळे ऊस वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नी संबंधित विभागाला निवेदन देऊनही दुर्लक्ष होत असल्याने नुकसानीच्या भीतीने शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या प्रकाराने शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
कोळे- आणे दरम्यान वांग नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधला आहे. रब्बीसह उन्हाळी पिकांना त्या पाण्याचा लाभ व्हावा, हा उद्देश आहे. ३० वर्षांपूर्वी त्याचे बांधकाम झाले आहे. २०११ पासून पाणी अडवण्यास सुरुवात झाली. ऑक्टोबर- नोव्हेंबर दरम्यान बंधाऱ्याला दरवाजे बसवून पाणी अडवण्यात येते. यंदाही ते अडवले आहे. बंधाऱ्याच्या भिंतीपासून मागे पाण्याची फुगी निर्माण झाली आहे. फुगीचे पाणी नदी पात्राबाहेर ठिकठिकाणी सरकले आहे. देसाई मळ्याकडे जाणाऱ्या रस्तावर पाणी सरकल्याने वाहनधारकांची गैरसोय झाली आहे. रस्ताच्या परिसरातील सुमारे १२ एकरांवरील ऊस वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. तानाजी देसाई, विनोद देसाई, बाजीराव देसाई, महेंद्र उकिर्डे, माणिक देसाई, प्रकाश देसाई, अनिल देसाई, बाबूराव देसाई, डी. के. देसाई आदी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा त्यात समावेश आहे. या प्रश्नी संबंधित पाटबंधारे विभागाच्या तळमावले शाखेला निवेदन देऊन आठ दिवस झाले. कर्मचाऱ्यांनी समस्यांची पाहणीही केली. मात्र, अद्याप त्याची दखल घेतली नसल्याचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याकडून उडवाउडवीचे उत्तरे दिल्याचे सांगण्यात येते. आडसाली ऊस अद्याप शेतात उभा आहे. त्याचे नुकसान सुरू आहे. सरासरीवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. प्लेट काढून फुगी काढण्यासाठी कंत्राटी ठेकेदार कामगारांना पुढे करून पैशाची मागणी केल्याची शेतकऱ्यांत चर्चा आहे. त्यामुळे शेतकऱ्यात संतप्त भावना निर्माण झाल्या आहेत. शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
B02143
आणे ः साठवण बंधाऱ्यातील फुगीमुळे देसाई मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर आलेले पाणी.
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

