

कऱ्हाडला ६४६ मुलींना एचपीव्ही लसीकरण
अभियानाला प्रतिसाद; गांधी फाउंडेशन-पंचायत समितीचा उपक्रम
कऱ्हाड, ता. २९ ः मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे, किशोरवयीन मुलींच्या आरोग्याबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने गांधी फाउंडेशन, पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या एचपीव्ही लसीकरण अभियानाला कऱ्हाड ग्रामीण व शहरी भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत कऱ्हाड ग्रामीणमधील १४ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात, तर कऱ्हाड व मलकापूर शहरातील नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून लसीकरण मोहीम राबविली. दोन दिवसांच्या उपक्रमात ५९६ मुलींचे लसीकरण केले.
लसीकरण करणाऱ्या प्रत्येक मुलीस हमखास भेटवस्तू देण्यात आली. अभियानाला पुढील पाच दिवसांची मुदतवाढ दिली. या कालावधीत आरोग्य विभागाच्या माध्यमातून पात्र मुलींपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न केले असून, त्याला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे लसीकरणाची संख्या ४७० वरून ६४६ पर्यंत पोहोचली. एकूण ६४६ मुलींना लस देऊन संरक्षित केले. यात १३३ लसीकरणासह काले प्राथमिक आरोग्य केंद्राने प्रथम, १०० लसीकरण करून सदाशिवगड प्राथमिक आरोग्य केंद्राने द्वितीय व वडगाव हवेली प्राथमिक आरोग्य केंद्राने ६४ लसीकरण करून तिसरा क्रमांक पटकावला.
या अभियानास जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी यांनी भेट दिली. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष धीरज गांधी व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनीता थोरात व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी व यंत्रणेने समन्वयाने काम केले.
पात्र वयोगटातील उर्वरित मुलींनी शासकीय आरोग्य यंत्रणेमार्फत उपलब्ध लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
W62321
कऱ्हाड ः लसीकरण अभियानास उपस्थित धीरज गांधी, डॉ. सुनीता थोरात, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आदी.
---------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.