कऱ्हाड सरसकट विनापरवाना अवैध बांधकामांवर कारवाई करा

कऱ्हाड सरसकट विनापरवाना अवैध बांधकामांवर कारवाई करा
Published on: 

कऱ्हाडला सरसकट अवैध
बांधकामांवर कारवाई करा

‘लोकशाही’चे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

कऱ्हाड, ता. २१ ः शहरातील सरसकट विनापरवाना व अवैध बांधकामांवर कसलाही भेदभाव न करता कायदेशीर कारवाई करावी, त्यासोबत पाच ऑक्टोबरला रविवार पेठेत नियोजित अतिक्रमणविरोधी कारवाईवेळी शासकीय कामात अडथळा निर्माण झालेल्या प्रकरणाचीही सखोल, निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी पालिकेतील लोकशाही आघाडीने मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले की, पालिकेने पाच ऑक्टोबरला रविवार पेठेतील पालिका जागेवर अतिक्रमण विरोधी कारवाई नियोजित केली होती. मात्र, ती प्रत्यक्षात पार पडू शकली नाही. कारवाईवेळी काहींनी जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केल्याने नियोजित प्रशासकीय कामात बाधा आल्याचे समोर आले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन लोकशाही आघाडीने मुख्याधिकारी व्हटकर यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे. त्यात तिघांची नावे असून, संबंधितांची चौकशी करावी. पालिकेच्या मालमत्तेचे आणि सार्वजनिक रस्त्यांचे रक्षण करणे प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यात कोणावरही अन्याय न होता पुराव्यांच्या आधारे पारदर्शक कारवाई व्हावी. केलेल्या कारवाईची माहिती लेखी स्वरूपात द्यावी, अशीही मागणी लोकशाहीने केली आहे. त्यासोबत शहरातील सर्वच विनापरवाना व अवैध बांधकामाची चौकशी करा. सरसकट विनापरवाना व अवैध बांधकामांवरही कायदेशीर कारवाई करावी. त्याबाबतचा अहवाल द्यावा, असे म्हटले आहे.

...................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com