

कऱ्हाडमध्ये दुचाकीवरून रॅली
कऱ्हाड, ता. २० ः औषध व्यावसायिकांनी आज कऱ्हाडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन करून शहरातून दुचाकी रॅली काढली.
या आंदोलनाला मेडिकल रिप्रेझेंटिव्ह संघटना, होमिओपॅथिक असोसिएशन, तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) यांचाही पाठिंबा लाभला. कऱ्हाड शहरात काही अपवाद वगळता बहुतांश मेडिकल दुकाने दिवसभर बंद राहिल्याने नागरिकांना औषध खरेदीसाठी काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागला. मात्र, अत्यावश्यक सेवा लक्षात घेऊन काही ठिकाणी आपत्कालीन औषध सेवा सुरू ठेवण्यात आली होती. जिल्ह्यातील कऱ्हाड, सातारा, पाटण, फलटण, वाई, खंडाळा, कोरेगाव आदी तालुक्यांतही आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
फोटो
PNE26W20727
-----------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.