

लोगो ः सकाळ इम्पॅक्ट
................................
रस्ता दुरुस्तीला ४० वर्षांनी उजळले भाग्य
कऱ्हाड रेल्वे स्थानक-टेंभू रस्ता काँक्रिटीकरणास प्रारंभ; लोकांच्या लढ्याला यश
ओगलेवाडी, ता. २ ः कऱ्हाड रेल्वे स्थानक ते टेंभूपर्यंतच्या खराब झालेल्या रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामास नुकताच प्रारंभ झाला. तब्बल ४० वर्षांनी या रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळाला.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पुढाकारातून नागरी सुविधा कार्य अंतर्गत माजी मंत्री बाळासाहेब पाटील व कऱ्हाडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या शिफारशीनुसार तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीला मुहूर्त मिळाला. या दुर्दशा झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आंदोलने व मोर्चे झाले. संबंधित रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी दै. ‘सकाळ’ने ही अनेकदा बातमीद्वारे शासनाचे लक्ष वेधले होते. २० लाख रुपये खर्चाच्या या काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामामुळे दहा दिवसांसाठी होणारी वाहतूक ओगलेवाडी, टेंभू प्रकल्प कार्यालय, ग्रामपंचायत हजारमाचीमार्गे कऱ्हाड रेल्वे
स्थानकापर्यंतच्या मार्गाने होणार असल्याची माहिती प्रशांत यादव यांनी दिली.
.........
चौकट
...........
नागरिकांची मागणी
कऱ्हाड ते रेल्वे स्थानकाकडे रेल्वे प्रवाशांची मोठी वाहतूक व वर्दळ असल्याने या रस्त्यावर पथदिव्यांची सोय करावी, तसेच दुतर्फा वृक्षारोपण व सुशोभीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
-------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.