

पुणे/कोथरूड, ता. २८ : युवा गायक प्रथमेश लघाटे यांना कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणे यांच्यातर्फे आयोजित वासंतिक उत्सवात पहिल्या ‘कऱ्हाडे युवारत्न पुरस्कारा’ने गौरविण्यात आले.
विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या हृदया हर्डीकर, प्रिया गुर्जर, अन्वी करंबेळकर, कुहू खांडेकर, जुहू खांडेकर आणि सानिया चांदोरकर यांचा ‘रणरागिणी झाशीची राणी साहसी शौर्य पुरस्कारा’ने गौरव करण्यात आला. कोथरूडमधील पुण्याई सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात लेफ्टनंट कर्नल अभिमन्यू आठल्ये आणि संघाचे अध्यक्ष अमित शहाणे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. दहावी, बारावी, शिष्यवृत्तीप्राप्त, पदवी, पदव्युत्तर परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. याप्रसंगी संघाचे मकरंद फणसळकर, विद्याधर शेवडे, सूर्यकांत सरवटे, हरी मुणगेकर, मुक्ता चांदोरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. शुभा मोघे यांनी सूत्रसंचालन केले. पुरस्कार वितरणानंतर लघाटे यांची संगीत मैफील झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.