करमाळा माझा प्रभाग माझे व्हिजन

करमाळा माझा प्रभाग माझे व्हिजन

Published on

KOR26B10652

स्वच्छता अन् नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष देणार

करमाळा ः प्रभाग क्रमांक सात खंदक रोड येथील धर्मवीर संभाजीराजे उद्यान, धर्मवीर संभाजीराजे व्यायाम शाळा निर्मिती करून तेथे जिम बांधून देणार आहे. भीमनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची निर्मिती करणे, भीमनगर येथील व्यायामशाळेत जिम साहित्य पुरवणे, कानड गल्ली येथे व्यायाम शाळेची निर्मिती करणे, प्रभागात चांगल्या पद्धतीने स्वच्छता राहावी म्हणून गटरीचे काम पूर्ण करणे, ज्या ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित लावली जात नाही, त्या ठिकाणी नोटीस बोर्ड लावून त्या ठिकाणी कॅमेरा लावून नागरिकांना स्वच्छता ठेवण्यास प्रोत्साहित करणे. भीमनगर मधील अंतर्गत गटारींची कामे करणे. आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता मोहीम राबवणे, नियमित पाणीपुरवठा करणे, रस्ते निर्मिती करणे, अभ्यासिकांची निर्मिती करणे, बचत गटामार्फत महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे प्रामुख्याने कापडी पिशवी निर्मिती उद्योग ज्यामुळे प्लास्टिकचे प्रमाण कमी होईल आदी संकल्प केले आहेत.
युवराज चिवटे, नगरसेवक करमाळा नगरपरिषद
--------------------------------

KOR26B10654
मजबूत टिकाऊ रस्ते, पाणी अन् स्वच्छतेला प्राधान्य

करमाळा ःप्रभाग सातमध्ये नागरिकांना स्वच्छ आणि मुबलक प्रमाणात नियमितपणे पाणी उपलब्ध करून देण्याचा पहिल्या दिवसापासून माझा प्रयत्न आहे. प्रभागात कुपनलिका घेऊन त्याद्वारे पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. नियमित स्वच्छता ठेवणे ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची बाब आहे. प्रभागात लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी सुंदर गार्डन करण्याचा मानस आहे. प्रभागातील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे, येत्या काळात हे सगळे रस्ते तयार होतील यासाठी पत्रव्यवहार सुरू केला आहे. प्रभागात अंतर्गत गटारी आणि रस्ते काँक्रिट करून घेण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. प्रभागातील महिलांसाठी नियमित आरोग्य शिबिरे आयोजित करणार आहे. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवणार आहे. प्रभागात भव्य असे बुद्ध विहार आणि अभ्यासिका तयार करण्यासाठी प्रस्ताव दिला असून त्याचा पाठपुरावा सुरू आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी करमाळा येथे भेट दिल्याची ऐतिहासिक नोंद आहे. ते ठिकाण माझ्या प्रभागात आहे, या ऐतिहासिक भेटीचे एक भव्य स्मारक उभे करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. प्रभागातील सिद्धार्थ व्यायामशाळा येथे युवकांसाठी जिमचे साहित्य उपलब्ध करून देणार आहे.
अश्विनी कांबळे अब्दुले, नगरसेविका, करमाळा नगरपरिषद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com