माझा प्रभाग.... माझे व्हिजन

माझा प्रभाग.... माझे व्हिजन

Published on

लोगो : करमाळा नगरपरिषद
---
KOR26B10632
---
करमाळा : नगर परिषदेच्या प्रभाग ९ मधून मला मतदारांनी भरभरून मतांनी निवडून दिले आहे. मतदारांनी जी अपेक्षा ठेवून मला मतदान केले, त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. माझ्या प्रभाग नऊमधील रस्त्यांची कामे प्राधान्याने करण्यावर भर देणार आहे. प्रभागामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी माझा आग्रह राहणार आहे. प्रभागातील सर्व नागरिकांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी नगरपरिषदेत आवाज उठवणार आहे. प्रभागातील रस्ते, गटारी, पाणीपुरवठा योजना आदी प्रश्न मार्गी लावण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करून निधी उपलब्ध करण्यासाठी मंत्रालय स्तरावर मी प्रयत्न करत आहे. स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचना नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या असून, माझ्या प्रभागात कुठेही अस्वच्छता दिसणार नाही, याची खबरदारी मी घेणार आहे.
- सचिन घोलप, नगरसेवक, करमाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com