

Forest Department Clarifies That Tree Felling Linked to the Proposed Hydropower Project in Karjat Taluka Is Not Connected to Bhimashankar Wildlife Sanctuary.
esakal
भीमाशंकर: रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात पाली तर्फे कोतवाल, खलाटी आणि साई डोंगर परिसरात प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पासाठी होणाऱ्या वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून पर्यावरण क्षेत्रात चर्चा सुरू आहे. या वृक्षतोडीचा संदर्भ भीमाशंकर अभयारण्याशी जोडला जात असल्याने याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, कर्जत तालुक्यातील संबंधित वृक्षतोडीचा भीमाशंकर अभयारण्याशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण भीमाशंकर अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी रणजित जाधव यांनी दिले आहे.