कर्मयोगी कारखाना निवडणूक: ६ अर्ज बाद तर, ४० अर्ज वैध

शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूकीसाठी छाननी प्रक्रियेनंतर ६ अर्ज बाद तर ४० अर्ज वैध ठरल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी, तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी दिली
कर्मयोगी कारखाना
कर्मयोगी कारखाना sakal

बिजवडी : येथील शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूकीसाठी छाननी प्रक्रियेनंतर ६ अर्ज बाद तर ४० अर्ज वैध ठरल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी, तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी दिली. कर्मयोगी कारखाना पंचवार्षिक निवडणूकीत २१ जागांसाठी ४६ अर्ज प्राप्त झाले होते.

कर्मयोगी कारखाना
आपणचं पैगंबर असल्याचा महिलेचा दावा; कोर्टानं सुनावला मृत्यूदंड!

सहकारातील अग्रगण्य कारखाना म्हणून हा सहकारी साखर कारखाना ओळखला जातो. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असे म्हटले जात होते. मात्र निवडणूकीतराष्ट्रवादी काँग्रेसने माघार घेतल्याने कारखानानिवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे.शेळगाव, पळसदेव,महिला, इतर मागासवर्गीय प्रवर्ग हे बिनविरोध झाल्यात जमा आहे तर ब वर्ग मध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या पॅनेलचे वसंत मोहोळकर हे उमेदवार आहेत.

कर्मयोगी कारखाना
रायगव्हाण व तावरजाची ओव्हरफ्लोकडे वाटचाल

त्यामुळे हा गट देखील बिनविरोध होणार आहे. दि.१२ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस असून त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. दि. २० ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून २२ ऑक्टोबर रोजी निकाल लागणार आहे.

छाननी प्रकियेनंतर अवैध ठरलेले अर्ज पुढील प्रमाणे :

इंदापूर गट–दिनकर गायकवाड,

कालठण गट – राघव व्यवहारे, शेळगाव गट - शिवाजी शिंगाडे व सर्जेराव शिंगाडे.

कालठण गट- काकासाहेब देवकर व सतीश जगताप

वैध अर्ज पुढीलप्रमाणे : इंदापूर गट

भरत शहा, शांतीलाल शिंदे, रवींद्र सरडे, अमोल इंगळे, मदन व्यवहारे, शिवाजी इजगुडे, दत्तात्रय कोळेकर, बाळासाहेब मोरे

कालठण गट : हर्षवर्धन पाटील, हनुमंत जाधव, सुभाष बोगाणे, छगन भोंगळे, गुलाब फलफले

शेळगाव गट : बाळासाहेब पाटील, राहुल जाधव, अंबादास शिंगाडे.

भिगवण गट : पराग जाधव, विश्वास देवकाते, सतीश काळे, यशवंत वाघ, विजय खर्चे, निवृत्ती गायकवाड, वसंत मोहोळकर, जगन्नाथ जगताप

पळसदेव गट : भूषण काळे, प्रवीण देवकर, रतन देवकर

महिला राखीव : शारदा कुबेर पवार, कांचन अशोक कदम

अनुसूचित जाती जमाती : केशव दुर्गे, बलभीम आढाव

इतर मागास प्रवर्ग : सतीश व्यवहारे

भटक्या विमुक्त जाती प्रवर्ग : हिरा पारेकर, शिवाजी इजगुडे

“ब” वर्ग प्रतिनिधी : हर्षवर्धन पाटील, वसंत मोहोळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com