कर्मयोगी कारखान्याने प्रत्येक वाहनांवर परिवर्तन बसविले : हर्षवर्धन पाटील

आदम पठाण
सोमवार, 3 डिसेंबर 2018

वडापुरी : इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व ट्रॅक्टर व बैलगाडीला परावर्तक (रिप्लेक्टर) बसवण्याचे काम पुर्ण केले असून कारखान्याच्या प्रत्येक ट्रॅक्टरला कारखान्याचा बारकोड लावला आहे. त्यामुळे कारखान्यात ऊस घेवून आलेले ट्रॅक्टर पुढे मागे होणार नाहीत अशी संगणकीय प्रणाली कारखान्याने राबवली आहे. त्यामुळे कोणतेही वाहन येथून पुढे मागे होणार नाहीत अशी ग्वाही हर्षवर्धन पाटील यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या मालकांना दिली.

कर्मयोगी साखर कारखाना व आर टी ओ कार्यालय बारामती व महामार्ग पोलिस डाळज यांच्या संयुक्त विद्यमाने वाहनांना परावर्तक बसवणे तसेच ऊस वाहतूक करण्ऱ्या वाहनांना बारकोड बसवणे, वाहनांची संगणकीय कृत नोदणी करणे कार्यशाळा आयोजित केली होती. त्यावेळी पाटील उपस्थित चालक मालक-यांना मार्गदर्शन करत होते.  यावेळी बारामतीचे आर टी ओ विनायक साखरे महामार्ग पोलिस निरीक्षक अभिमान अभंग, कारखान्याच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले, रमेश जाधव, भरत शहा,प्रशांत सुर्यवंशी,भास्कर गुरगुडे ,आबासाहेब शिगाडे,हनुमंत जाधव,पाडुरंग गलाडे,राजाराम गायकवाड,सुभाष काळे.,कार्यकारी संचालक बायजीराव सुतार इत्यादी मान्यवर उपस्थित होते

पाटील पुढे म्हणाले कि, ''सर्व ट्रॅक्टर चालकांनी वाहन चालवताना काळजी घेतली पाहिजे. आपल्या चुकीमुळे अनेकांना प्राणांना मुकावे लागते. त्याचे संसार उद्ध्वस्त होतात. त्याचे भान ठेवले पाहिजे.'' कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी केले तर, आभार प्रशांत सुर्यवंशी यांनी मानले.

Web Title: Karmayogi plant changes reflector of every vehicle : Harshvardhan Patil