स्वातंत्र्य लढ्यामध्ये पुण्याचे योगदान मोठे; कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

स्वातंत्र्य लढ्याचे पहिले बीज लोकमान्य टिळकांनी या भूमीतून पेरले. पुण्याचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान महत्वपूर्ण आहे.
karnataka CM Basavaraj Bommai statement Pune contribution in freedom struggle 75 Independence day hadapsar
karnataka CM Basavaraj Bommai statement Pune contribution in freedom struggle 75 Independence day hadapsarsakal

हडपसर : स्वातंत्र्य लढ्याचे पहिले बीज लोकमान्य टिळकांनी या भूमीतून पेरले. पुण्याचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान महत्वपूर्ण आहे. स्वांत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना त्याला विशेष महत्व आहे. हा उत्सव साजरा करण्याची कल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडली. शतकमहोत्सवापर्यंत देश विश्वगुरू करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले आहे. त्यासाठी आम्ही त्याची पायाभरणी करीत आहोत, असे प्रतिपादन कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित "घर घर तिरंगा' अभियानाची सुरुवात व महासंघाच्या अहवालाचे प्रकाशन कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते झाली.

याशिवाय कर्नाटक राज्यातील सर्व देवस्थानांना बोम्मई यांच्या सरकारने स्वायत्तता दिल्याबद्दल त्यांचा ग्रंथतुला करून महासंघाच्या वतीने विशेष सत्कारही करण्यात आला, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. येथील अमनोरा टाऊनशीपमधील फर्नक्लबमध्ये हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे होते. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.

पंडीत वसंतराव गाडगीळ, ब्राह्मण महासंघाच्या ब्रम्होद्योगचे उपाध्यक्ष त्रीविक्रम जोशी, राष्ट्रीय उपाध्यक्ष सी. रमणाचार्य, श्याम रघुनंदन, भाजपाचे राष्ट्रीय पदाधिकारी सी. टी. रवि, सिटी कॉर्पोरेशनचे उपाध्यक्ष सुनील तरटे, महासंघाचे जिल्हाध्यक्ष मंदार रेडे, कोषाध्यक्ष कमलेश जोशी, पुरोहित अध्यक्ष संतोष वैद्य, महिलाध्यक्ष केतकी कुलकर्णी, लक्ष्मीकांत पांडे, सुधीर मेथेकर, राजेंद्र कुलकर्णी, रत्नाकर जोशी आदी यावेळी उपस्थित होते.मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, "हा तरूणांचा देश आहे.

त्यामुळे भविष्यात निश्चितपणे आपला देश जगाचे नेतृत्व करू शकेल. ज्ञान हे या काळातील मोठे साधन आहे. ब्राम्हण समाजाकडे ते आहे, हे आपले भाग्य आहे. पुणे आणि बंगळूर ही शहरे देशातील महत्वपूर्ण असून माहिती तंत्रज्ञानाच्या बाबतीत ती देशाला मार्गदर्शक आहेत.' यावेळी बोम्मई यांनी अमनोरा सिटीचे कौतुक करून येथून एक सकारात्मकता मिळत असल्याचे सांगितले. संपूर्ण देशात ही सिटी आदर्श असून अनिरुद्ध देशपांडे यांनी कर्नाटकातही असे काम उभे करण्यासाठी निमंत्रण देत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

भाजपाचे राष्ट्रीय पदाधिकारी सी. टी. रवि म्हणाले, "अमृत्वमहोत्सवाच्या काळात भारत सामुहिक स्वरूपात विश्वगुरूझाला पाहिजे. त्यासाठी शक्ती व भक्तीची जोपासना प्रत्येकाने केली पाहिजे. प्रत्येक अवयवाचे काम व नाव वेगवेगळे असले तरी वेदना एकच आहे. त्यामुळे आपण जरी वेगवेगळ्या प्रांतातील असलो तरी दहशतवादाविरोधात आपण एकविचाराने लढले पाहिजे. जातीवाद, दहशतवाद काट्यासारखे आहे. त्यासाठी हिंदुत्व ही भावना ठेवून सामोरे गेले पाहिजे.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com