
मार्केट यार्ड : कोकणातील हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्यानंतर कर्नाटक आंब्याचा हंगाम बहरला आहे. कर्नाटकातून आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हापूसप्रमाणे चव असलेल्या कर्नाटकातील आंब्यांना मागील काही वर्षांपासून मागणी वाढली आहे. यंदा वातावरणातील बदलामुळे हापूसचे उत्पन्न कमी प्रमाणावर आले आहे. जून महिन्यापर्यंत कर्नाटकातील आंबा बाजारात उपलब्ध राहणार आहे.