कोपर्डे हवेली : अपक्षांच्या गावभेटीला उत्स्फूर्त प्रतिसाद....
वेताळ, पिसाळ यांचा गावोगावी प्रचार
कोपर्डे हवेली, ता. ३ : जिल्हा परिषद गटातील अपक्ष उमेदवार विद्या रामकृष्ण वेताळ, वाघेरी पंचायत समिती गणातील अपक्ष उमेदवार नीलम पिसाळ आणि कोपर्डे हवेली पंचायत समिती गणातील अपक्ष उमेदवार अमित पाटील यांनी सध्या गावभेटीवर भर दिला आहे. नडशी, शिरवडे, अंतवडी आणि रिसवड या गावांमध्ये त्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला. प्रत्येक गावात ग्रामस्थांनी ढोल- ताशांच्या गजरात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात त्यांचे स्वागत झाले.
गावभेटीदरम्यान दबावाला न झुकणारा, स्वतःचे निर्णय घेणारा आणि सामान्य माणसाशी नाळ जोडणारा उमेदवार हवाय. कऱ्हाडचा स्वाभिमान, गावाचा आत्मसन्मान आणि स्थानिक नेतृत्वाला न्याय मिळावा, यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करण्याची ग्वाही ग्रामस्थांकडून मिळत असल्याचे विद्या वेताळ यांनी स्पष्ट केले.
अनेक वर्षे पक्षासाठी प्रामाणिकपणे झटणाऱ्या विद्या वेताळ यांना पक्षाने डावलल्याची खंत कार्यकर्ते आणि मतदारांच्या मनात कायम आहे. या पार्श्वभूमीवर त्या अपक्ष उमेदवार म्हणून सामोरे जात असून “आपणच आमचे उमेदवार” हीच भावना आता या भागातील नागरिकांमध्ये दिसून येत असल्याचे श्री. वेताळ यांनी स्पष्ट केले.
या वेळी समर्थकांनी बोलताना सांगितले, की रामकृष्ण वेताळ आणि सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या प्रचार दौऱ्यात प्रभावी जनसंपर्क साधला जात आहे. वाढती गर्दी, उत्साह आणि सक्रिय सहभाग पाहता विरोधकांच्या गोटातही अस्वस्थता निर्माण झाली आहे. आगामी दिवसांत हा जनाधार आणखी मजबूत होईल, अशी चिन्हे या गावभेटीतून स्पष्ट दिसत आहेत.
फोटो :.........02380
नडशी : गाव भेटीदरम्यान मतदारांशी संवाद साधताना विद्या वेताळ, अमित पाटील.
.....................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

