

Devotees gather in large numbers at Pandharpur for the Kartiki Ekadashi celebrations.
esakal
पंढरपूर ,: कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात आज लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. विठ्ठल नामाच्या जयघोषाने अवघी पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे.
कार्तिकी एकादशीचा मुख्य सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशमधून सुमारे पाच ते सहा लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. पंढरपूर शहराकडे येणारे सर्व रस्ते भाविकांनी व दिंड्यांनी फुलून गेले आहेत.