

कार्तिकी वारीसाठी मध्य रेल्वेच्या ३६ विशेष फेऱ्या
१७ ते २३ नोव्हेंबरदरम्यान पंढरपूर, सोलापूर, मिरज, लातूर येथून अतिरिक्त सेवा
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १६ : पंढरपूर येथे २१ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी होत असून, वारीसाठी येणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने ३६ विशेष अनारक्षित गाड्यांच्या फेऱ्यांचे नियोजन केले आहे. या गाड्या १७ ते २३ नोव्हेंबरदरम्यान धावणार आहेत. त्यामुळे पंढरपूरसह सोलापूर, मिरज, लातूर आणि मार्गावरील भाविकांना अतिरिक्त रेल्वे सुविधा मिळणार आहे.
---
मिरज-लातूर २२ फेऱ्या
गाडी क्र. ०१४०५ मिरज-लातूर विशेष गाडी १७ ते २३ नोव्हेंबरदरम्यान दररोज सकाळी ७ वाजता मिरज येथून सुटून दुपारी २.३५ वाजता लातूरला पोचेल. ही गाडी पंढरपूरला सकाळी १०.१५ वाजता पोचून १०.२० वाजता सुटेल. गाडी क्र. ०१४०६ लातूर-मिरज दररोज दुपारी ३.५० वाजता लातूरहून सुटेल. पंढरपूरला रात्री ७.४५ वाजता पोचून ७.५० वाजता सुटेल आणि रात्री ११.४५ वाजता मिरजला पोचेल. याशिवाय १९ ते २२ नोव्हेंबरदरम्यान गाडी क्र. ०१४०७ मिरज-लातूर रात्री १० वाजता मिरजहून सुटून पंढरपूरला रात्री ११.५० वाजता येईल व ११.५५ वाजता सुटेल. गाडी क्र. ०१४०८ लातूर-मिरज सकाळी ६ वाजता लातूरहून सुटून पंढरपूरला सकाळी १०.०५ वाजता पोचेल आणि १०.१० वाजता पुढे रवाना होईल.
---
सोलापूर-मिरज १४ फेऱ्या
गाडी क्र. ०१४१९ सोलापूर-मिरज १७ ते २३ नोव्हेंबरदरम्यान दररोज सकाळी ७ वाजता सोलापूरहून सुटेल. पंढरपूरला सकाळी ९.५० वाजता पोचून ९.५५ वाजता सुटेल. मिरजला दुपारी १२.२० वाजता पोचेल. गाडी क्र. ०१४२० मिरज-सोलापूर दररोज दुपारी १ वाजता मिरजहून सुटून पंढरपूरला दुपारी २.५० वाजता पोचेल आणि २.५३ वाजता सुटेल. सोलापूरला ही गाडी सायंकाळी ७.१० वाजता पोचेल.
....
प्रमुख स्थानकांवर थांबे
या विशेष गाड्यांना पंढरपूर, सांगोला, मोडनिंब, कुर्डुवाडी, बार्शी टाऊन, धाराशिव, येडशी, कळंब रोड, माढा, मोहोळ, जत रोड, ढालगाव, कवठे महांकाळ, साळगरे आणि आरग यांसह मार्गावरील विविध स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. प्रत्येक विशेष गाडीला १६ जनरल सेकंड क्लास / स्लीपर क्लास आणि दोन लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन असे एकूण १८ अनारक्षित डबे असतील.
---
रेल्वे स्थानकांवरून तिकीट सुविधा
या सर्व गाड्या अनारक्षित असल्याने प्रवाशांना तिकीट रेल्वे स्थानकांवरील तिकीट खिडकीवरून किंवा ‘रेलवन’ ॲपद्वारे घेता येणार आहे. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक रेल्वेच्या संकेतस्थळावर तसेच ‘रेलवन’ आणि ‘एनटीईएस’ ॲपवर उपलब्ध आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.