

आळंदी, ता. ७ : श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदी येथे कार्तिकी यात्रा २०२६च्या पर्वकाळात २ ते ६ डिसेंबर या कालावधीत अखंड हरिनाम उत्सवाचे आयोजन केले आहे. या उत्सवाच्या माध्यमातून भाविकांना कीर्तन, प्रवचन, हरिपाठ व संगीत भजनसेवेचा आध्यात्मिक श्रवणाचा लाभ घेता येणार असल्याची माहिती आळंदी नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे व मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली.
उत्सवामध्ये नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार तसेच गायक कलाकार आपली सेवा सादर करणार आहेत. उत्सवाचे प्रमुख कार्यक्रम दररोज पहाटे ४ ते ६ विरहणी अभंग गायन कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर होणारे कार्यक्रम पुढीलप्रमाणे :
बुधवारी (ता. २ डिसेंबर) सकाळी १० ते १२ ज्ञानेश्वर महाराज शिंदे यांचे कीर्तन, सायंकाळी ४ ते ५ आत्माराम शास्त्री यांचे प्रवचन, सायंकाळी ६ ते ८ केशव महाराज उखळीकर यांचे कीर्तन, रात्री ९ ते ११ जागर स्त्री शक्तीचा, सूर गृहलक्ष्मीचा ज्योती गोऱ्हाणे यांचे गायन होणार आहे.
गुरुवारी (ता. ३) सकाळी १० ते १२ जयवंत महाराज बोधले यांचे कीर्तन, सायंकाळी ४ ते ५ बाळासाहेब शेवाळे यांचे प्रवचन, सायंकाळी ६ ते ८ बापूसाहेब देहूकर यांचे कीर्तन, रात्री ९ ते ११ नागेश आडगावकर यांची संगीत भजनसेवा पार पडेल.
शुक्रवारी (ता. ४) सकाळी १० ते १२ डॉ. चेतनानंद पुणेकर यांचे कीर्तन, सायंकाळी ४ ते ५ डॉ. नारायण म. जाधव यांचे प्रवचन, सायंकाळी ६ ते ८ रामराव महाराज ढोक यांचे कीर्तन, रात्री ९ ते ११ पंडित कल्याणजी गायकवाड, कार्तिकी गायकवाड, कौस्तुभ गायकवाड यांची संगीत भजनसेवा पार पडेल.
शनिवारी (ता. ५) कार्तिकी एकादशी - सकाळी १० ते १२ समाधान शर्मा यांचे कीर्तन, सायंकाळी ४ ते ५ प्रकाश महाराज बोधले यांचे प्रवचन, सायंकाळी ६ वाजता एकादशीनिमित्त इंद्रायणी नदीची विशेष आरती होईल. त्यानंतर सायंकाळी ६ ते ८ गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे कीर्तन, रात्री ९ ते ११ ऋषी महाराज पाटील यांची संगीत भजनसेवा पार पडेल.
रविवार, (ता. ६) श्री संत ज्ञानदेवांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त संत नामदेव महाराजांचे वंशज केशव महाराज नामदास यांचे विशेष कीर्तन होईल.
यावेळी नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे म्हणाले, “आळंदी ही संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीमुळे वारकरी व भाविकांचे श्रद्धास्थान आहे. कार्तिकी यात्रा हा आळंदीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा उत्सव आहे. या उत्सवानिमित्त पसायदान मंच, इंद्रायणी घाट येथे आयोजित अखंड हरिनाम उत्सवामुळे आळंदी नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण होईल. वारकरी संप्रदायाची परंपरा, संतांचे विचार आणि हरिनामाचा महिमा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यास या उपक्रमाची निश्चितच मदत होईल. सर्व वारकरी, भाविक आणि नागरिकांनी या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.”
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.