Karvenagar Issue Sakal
पुणे
Pune News : विद्युत रोहित्र..लोखंडी जाळ्या अन् धोकादायक पहाड, वारजे-कर्वेनगर परिसरातील स्थिती; अनधिकृत फलकबाजींवर कारवाईची मागणी
Karvenagar Issue : कर्वेनगरमधील रस्त्यावर उभ्या असलेल्या लाकडी बांबूच्या धोकादायक संरचना नागरिकांच्या सुरक्षेसाठी संकट ठरत असून, त्या तातडीने हटवण्याची मागणी होत आहे.
कर्वेनगर : कर्वेनगर भागातील मुख्य रस्त्यावर वारजे उड्डाणपुलाजवळ महावितरणचे विद्युत रोहित्र, विद्युत खांब, लोखंडी जाळ्या असून, अशातच भर म्हणून लाकडी बांबूचे धोकादायक पहाडही उभे आहे. हे पहाड नागरिकांसाठी अतिशय धोकादायक झाले आहे. तरी सार्वजनिक ठिकाणी असलेले हे धोकादायक पहाड तातडीने हटविण्याची मागणी नागरिक करत आहे.