
कर्वेनगर : वारजे, कर्वेनगर, शिवणे, कोंढवे-कोपरे आणि कोंढवे-धावडे परिसरात अनधिकृत फ्लेक्सचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. धोकादायक पद्धतीने उभारलेले हे फलक वाऱ्याच्या झोताने किंवा जोरदार पावसामुळे कोणत्याही क्षणी कोसळू शकतात, त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.