कास - कास परिसरात वन्यप्राण्यांसाठी चाळीस पेक्षा जास्त पाणवठे

कास - कास परिसरात वन्यप्राण्यांसाठी चाळीस पेक्षा जास्त पाणवठे

Published on

वन्यप्राण्यांसाठी ४० पेक्षा जास्त पाणवठे

कास समिती व वन विभागाचा उपक्रम; पाण्याची सोय

कास, ता. १६ : फुलांच्या अलौकिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या व सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या कास पठार परिसरात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वन्यप्राण्यांच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी कास पठार समिती व वन विभाग यांनी पुढाकार घेतला आहे. समितीच्या वतीने वन परिसरात सुमारे ४० ते ५० पाणवठे तयार करण्यात आले असून, त्यामध्ये नियमितपणे पाणी सोडले जात आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांत जंगल परिसरातील नैसर्गिक पाणीस्रोत आटू लागतात. त्यामुळे वन्यप्राण्यांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागते. ही अडचण लक्षात घेऊन कास पठार समितीने वन विभागाच्या सहकार्याने विविध ठिकाणी पाणवठे तयार केले आहेत. या पाणवठ्यांमध्ये टँकर किंवा इतर माध्यमातून पाणी भरून वन्यप्राण्यांना पिण्यासाठी उपलब्ध करून दिले जाते.
या उपक्रमामुळे हरण, ससे, माकडे, गवे, बिबट्या तसेच इतर लहान-मोठ्या वन्यप्राण्यांना मोठा दिलासा मिळत आहे. पर्यावरण संवर्धनाबरोबरच वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी समितीचा हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.
स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींकडून या कार्याचे कौतुक होत असून, भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे वनसंपदा आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्याचे प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला आहे.

कोट
कास पठार परिसर जैवविविधतेची खाण असून, परिसरात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा वावर आहे. सध्या तीव्र उन्हाळा सुरू असून, वन्यप्राण्यांच्या पाण्याची सोय लक्षात घेऊन पाणवठे तयार करण्यात आले आहेत.
-दत्ता किर्दत, कास

फोटो
04730,04731
कास : वन्यप्राण्यांसाठी तयार करण्यात आलेल्या पाणवठ्यावर पाणी भरताना कास समितीचे कर्मचारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com