कास - सकाळ बातमीचा परिणाम.... कास बामणोली रस्त्याचे काम सुरू...
लाेगाे ः सकाळ इम्पॅक्ट
................
कास-बामणोली-वाकी रस्त्याची दुरुस्ती
कामास प्रारंभ; शासकीय नोटिसीला न जुमानणारा ठेकेदार सरळ
कास, ता. १५ ः सातारा- यवतेश्वर- पेट्री- घाटाईदेवी मंदिर- कास- बामणाेली- गोगवे ते तापोळा या रस्त्याची दुरवस्था आहे. त्याच्या डागडुजीचे काम देऊनही ठेकेदार त्याकडे दुर्लक्ष करत होता. ‘बांधकाम’ची नोटीसही गांभीर्याने घेतली जात नव्हती. याबाबत दै. ‘सकाळ’मध्ये नुकतीच बातमी प्रसिद्ध झाली. त्यानंतर या रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
जागतिक वारसास्थळ असलेले कास पठार तसेच दुर्गम बामणोलीपासून तापोळ्यापर्यंतच्या दुर्गम भागाला जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी जोडणारा प्रमुख जिल्हा मार्ग २६ सातारा- यवतेश्वर- पेट्री- घाटाईदेवी मंदिर- कास- बामणाेली- गोगवे ते तापोळा दुरवस्थेत आहे. मेढ्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली होती. त्यात म्हटले, की सातारा- यवतेश्वर- पेट्री- घाटाईदेवी फाटा- घाटाईदेवी मंदिर- कास- बामणोली- गोगवे- तापोळा महाबळेश्वर रस्ता वार्षिक देखभाल दुरुस्ती करण्यासंदर्भात काम घेतले आहे. या कामाचा कार्यारंभ आदेश आपणास प्राप्त आहे. या रस्त्यावर सद्यःस्थितीत मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. बाजूपट्टीवर अनेक झाडांच्या फांद्या आल्या आहेत. त्यामुळे वळणावर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वार्षिक देखभाल दुरुस्तीअंतर्गत खड्डे भरण्याचे, तसेच बाजूपट्टीवर आलेले गवत तासणे व झाडाच्या फांद्या काढणे व निविदेप्रमाणे इतर दुरुस्तीच्या कामास त्वरित सुरुवात करणे गरजेचे आहे. संबंधित दुरुस्तीची कामे करण्याबाबत कळविले होते. काम व संबंधित रस्त्याची लांबी व आनुषंगिक माहिती दिली आहे, तरीही खड्डे भरण्याबाबत तसेच वार्षिक देखभाल दुरुस्तीची कोणतीही कामे करण्यास सुरुवात केलेली नाही. या कामाबाबत छत्रपती संघटनेचे तानाजी किर्दत यांनी निवेदन दिले होते. रस्त्याच्या वस्तुस्थितीचे चित्र प्रसिद्ध होताच काम सुरू करण्यात आले आहे.
...............
चौकट
............
दर्जेदार कामाची अपेक्षा
या रस्त्याच्या वार्षिक देखभाल दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. मात्र, संबंधित काम उत्कृष्ट व दर्जेदार व्हावे, यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी या भागातील नागरिकांतून होत आहे.
...................
B04722,
कास ः सातारा- बामणोली रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे सुरू असलेले काम.
..............................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

