

The three-day religious festival featured kirtans, maha aarti, community meals, and traditional celebrations dedicated to Shri Sant Balumama.
Sakal
तळेगाव ढमढेरे : कासारी (ता. शिरूर) येथे श्री संत सद्गुरु बाळूमामा च्या पालखीची वाजत गाजत, भंडारा उधळत, बाळूमामाचं चांगभलं या उद्घोषात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी श्री संत बाळूमामाच्या पालखीचे ग्रामस्थांनी मनोभावे दर्शन घेतले. तीन दिवसाच्या पालखी सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रम झाले.