Kasari Tree Plantation
Sakal
तळेगाव ढमढेरे : कासारी (ता.शिरूर) गावातील गायरान गट क्रमांक ६१३ मधील सुमारे ३० एकर क्षेत्रात विविध जातींच्या १००० रोपांची सोमवारी लागवड करण्यात आली आहे. कन्हेरसर (ता.खेड) येथील अबेरडेअर टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, ट्रीओ ट्री फाउंडेशन आणि कासारी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व ठिबक सिंचनप्रणाली अभियान राबविण्यात येत असून, येथील गायरान जमिनीत विविध जातींची, सावली व फळे देणाऱ्या १००० झाडांची लागवड करण्यात आली आहे. येथील जागेत ५००० हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट असल्याचे कंपनीचे अधिकारी योगेश चांदगुडे, संचालक राजेश भोसले व गणेश काकडे यांनी सांगितले.