Kasari Sonarmala Road: कासारीतील सोनारमळा रस्ता वर्षानुवर्षे दुरावस्थेत; ग्रामस्थांचा ‘रस्ता देता का’ असा आक्रोश

कासारीतील सोनार मळा रस्त्याची वर्षानुवर्षे दुरावस्था; पावसाळ्यात विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण, बिबट्याच्या भीतीने रात्रीची कसरत अधिक भयावह
Students, senior citizens, women and farmers face daily hardships while commuting, prompting calls for urgent action from the administration.

Students, senior citizens, women and farmers face daily hardships while commuting, prompting calls for urgent action from the administration.

Sakal

Updated on

तळेगाव ढमढेरे : कासारी (ता. शिरूर) सोनार मळा येथे येण्या - जाण्यासाठी वर्षानुवर्ष दुरावस्था झालेल्या रस्त्याने स्थानिक ग्रामस्थांना मार्गक्रमण करावा लागत आहे. पावसाळ्यात अतिशय बिकट परिस्थिती या रस्त्याची होते. शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, शेतमजूर व स्थानिक ग्रामस्थांना या लोकवस्तीवर येण्या- जाण्यासाठी पावसाळ्यात प्रचंड कसरत करावी लागते. पावसाळ्यात या रस्त्याने पायी चालणे अतिशय कठीण होते. वाहने तर या रस्त्याने जाऊ शकत नाहीत. या रस्त्याने येण्या- जाण्यासाठी ग्रामस्थांना जीव मुठीत धरावा लागतो. रात्रीच्या वेळी तर अत्यंत भयानक कसरत करावी लागते. त्यातच परिसरात बिबट्याच्या भीतीने ग्रामस्थ भयभीत होतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com