कासारवाडी जिल्हा परिषद शाळेत बालिका दिन साजरा

कासारवाडी जिल्हा परिषद शाळेत बालिका दिन साजरा

Published on

कासारवाडी शाळेत
बालिका दिन साजरा
पांगरी : कासारवाडी (ता. बार्शी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पाचवीतील विद्यार्थिनींनी प्रतिमेचे पूजन केले. यावेळी सरपंच अश्विनी मंडलिक, उपसरपंच सुधीर गायकवाड, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रीती कांबळे, उपाध्यक्षा अंबिका खाडे उपस्थित होत्या. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर वीणा कदम यांनी माहिती दिली. इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थिनींनी विविध गीतांचे सादरीकरण केले. बालिकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Marathi News Esakal
www.esakal.com