आजारी बापटांना प्रचारात उतरवणं योग्य होतं का? शरद पवार म्हणतात...: Sharad Pawar on Girish Bapat | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shrad Pawar Girish Bapat

Sharad Pawar on Girish Bapat: आजारी बापटांना प्रचारात उतरवणं योग्य होतं का? शरद पवार म्हणतात...

पुणे : खासदार गिरीश बापट हे आजारी असतानाही भाजपनं त्यांना पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरवल्यानं भाजपवर चौफेर टीका होत आहे. तर भाजपनं याचं समर्थन करताना देश प्रथम, मग पक्ष, शेवटी स्वतः अशा शब्दांत बापट यांचं कौतुक केलं आहे. यावर आता शरद पवार यांनी देखील भाष्य केलं आहे. (Kasba By election Sharad Pawar speaks on Girish Bapat campaign for BJP)

पवार म्हणाले, "त्यांना प्रचारात आणणं ही भाजपची गरज होती का? ठाऊक नाही. पण मी गिरीश बापट यांना भेटून आलो होतो, त्यांची प्रकृती पाहता त्यांच्या यातना वाढू नये हीच अपेक्षा आहे" बापट यांनी काल कसबा मतदार संघात भाजपच्या सभेला हजेरी लावली तसेच मतदारांना आवाहन करताना भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनाच बहुमतानं निवडून द्या असं आवाहनही केलं.

सोशल मीडियावर टीका

दरम्यान, गिरीश बापट यांना व्हीलचेअरवरुन प्रचारार्थ मैदानात उतरवल्यानं भाजपनं याचा मोठा इव्हेंट केला. माध्यमांनीही त्यांना मोठी प्रसिद्धी दिली. यापूर्वी विधानपरिषदेच्या निवडणुकीत चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि कसब्याच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांना मतदानासाठी एअर अँम्ब्युलन्सनं मुंबईला नेण्यात आलं होतं. त्याचबरोबर माजी केंद्रीय मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना देखील आजारी असताना भाजपनं प्रचारात उतरवल्याचा दाखला देत सोशल मीडियावर जोरदार टीका केली आहे.