Kasaba Byelection : कसबा निवडणुकीत ट्विस्ट! शुक्रवारी शिंदे गटाची पुण्यामध्ये बैठक

CM eknath shinde
CM eknath shindeesakal

पुणेः कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची नावे निवड समितीपुढे ठेवली जाणार आहेत. त्यासाठी उद्या (ता. २) मुंबईत बैठक होणार आहे. त्यातच आता शिंदे गटाचीदेखील पुण्यामध्ये शुक्रवारी बैठक होणार असल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने कसब्याच्या जागेवर दावा केल्यानंतर त्यासंदर्भात विरोधीपक्ष नेते अजित पवार हे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बारामती हॉस्टेलवर बैठक घेणार आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षाच्या बैठकांमध्ये काय निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे.

यातच आता पुण्यात शुक्रवारी शिंदे गटाची बैठक होणार आहे. कसबा पोटनिवडणुकीसंदर्भात शिंदे गटामध्ये खल होणार असल्याची माहिती आहे. शुक्रवारी शिंदे गट आणि भाजपमध्ये ही बैठक संपन्न होईल.

CM eknath shinde
Ajit Pawar : CM शिंदेंमुळे राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर? अजित पवार यांची धावाधाव सुरु

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची बैठकीला उपस्थितीत राहणार असल्याची माहिती आहे. शिंदे गट कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपला पाठिंबा जाहीर करणार असल्याचं स्पष्ट आहे.

आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने या रिक्त झालेल्या जागेची पोट निवडणूक जाहीर झाली आहे. या जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासही सुरुवात झाली आहे. मात्र, अद्याप एकाही पक्षाने उमेदवार जाहीर केलेला नाही.

हेही वाचा: Jitendra Awhad : आव्हाड म्हणतात, मला कधीही अटक होऊ शकते; काय आहे कारण?

काँग्रेसचे नेते भारत जोडो यात्रेमध्ये गेल्याने पुण्यात व प्रादेशिक पातळीवर कोणीही चर्चा करण्यासाठी उपलब्ध नव्हते. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या तिन्ही पक्षांची महाविकास आघाडी म्हणून एकही बैठक न झाल्याने निवडणुकीचे वातावरण तयार झालेले नाही.

दुसरीकडे भाजपने पाच इच्छुकांची नावे प्रदेश भाजपकडे पाठवले आहेत, सर्वेचा अहवालही नेत्यांकडे सादर झाला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात उमेदवार जाहीर होणार आहे, असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com