
Ravindra Dhangekar : निकालाचं नो टेन्शन, धंगेकर यांनी मारला मिसळीवर ताव
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कसब्यात कांटे की टक्कर बघायला मिळत आहे. कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहेत. दरम्यान, त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. पेठेतील एका हॉटेलमध्ये धंगेकर मिसळीवर ताव मारताना दिसत आहेत. (kasba bypoll election result ravindra dhangekar viral video Misal Pav)
निकालापूर्वी, कसब्याचे कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचं त्यांच्या पत्नीने औक्षण केलं. घरातील देवाच्या पायापडून त्यांनी मतमोजणीच्या दिवसाची सुरुवात केली आहे. आज मीच विजयी होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर त्यांनी पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपतीचं दर्शन घेतलं आणि कार्यकर्त्यांसोबत चहापान केलं.
यावेळी त्यांनी मिसळ, भजी यासर्वांवर चांगलाच तावं मारल्याचे पाहायला मिळालं.
पुण्याच्या पेठांमधूनदेखील रवींद्र धंगेकरांना आघाडी मिळाल्यानंतर भाजपची धाकधूक वाढली आहे. शनिवार पेठ आणि बाकी काही पेठांवर भाजपच्या हेमंत रासने यांचं वर्चस्व आहे. मात्र याच भागातून धंगेकर यांनी आघाडी घेतल्याने भाजपचं टेन्शन काही प्रमाणात वाढलं आहे.