Kasba Bypoll Election
Kasba Bypoll Election

Kasba Bypoll Election: निवडणुक आयोगाचा भोंगळ कारभार; कसब्यात मतदार यादीत मयतांची नावं अन्...

कसबा विधानसभा मतदार संघात पहिल्या चार तासात केवळ सव्वा आठ टक्के मतदान झाल्यामुळे मतदारांचा पोटनिवडणुकीमधील निरुत्साह दिसून आला.

कसबा विधानसभा मतदार संघात पहिल्या चार तासात केवळ सव्वा आठ टक्के मतदान झाल्यामुळे मतदारांचा पोटनिवडणुकीमधील निरुत्साह दिसून येत आहे. या घटनेला निवडणुक आयोग जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. मतदार याद्या अद्ययावत केल्या असे सांगितले गेलेले असले तरी यामध्ये मयत मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Kasba Bypoll Election The names of dead person in the list but the living name are missing in the voter list )

मिळालेल्या माहितीनुसार, अद्ययावत केलेल्या मतदार याद्यांमध्ये मयत मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात आढळली आहेत. तर जिवंत असलेल्या मतदारांची नावं यादीतून गायब आहेत. दोन-तीन केंद्रांवर फिरून नाव आहे का याची चौकशी केली जात आहे. पण नाव सापडत नसल्याने नाईलाजाने मतदान न करता नागरिकांना घरी जावे लागत असल्याचे समोर आले आहे.

मतदानासाठी आलेल्या सुवर्णा कुलकर्णी यांनी माध्यमांशी संवाद साधला. , "गेल्या चार निवडणुकांपासून मी केळकर रस्त्यावरील कन्या शाळेत मतदान करत होते. पण आज सकाळी मतदानाला गेले असता माझं नाव यादीमध्ये नसल्याचे दिसून आले. या परिसरातील दोन-तीन केंद्रांवरून फिरून आले. पण एकाही ठिकाणी माझे नाव नसल्याने मतदान करता आलेले नाही.'' अशी खंत मतदार सुवर्णा कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

पुणे शहरात कसबा विधानसभा मतदारसंघात आज पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत एकूण दोन लाख ७५ हजार ६७९ इतके मतदान आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर या दोघांमध्ये चुरशीची लढत होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com