Kasba Bypoll Election : कसब्याचा किंगमेकर ठरला? रात्रीच झळकले विजयाचे बॅनर

कार्यकर्त्यांना भलतीच घाई, निकालाआधीच झळकले पुण्यात विजयाचे पोस्टर
Kasba Bypoll Election
Kasba Bypoll ElectionEsakal

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या पुण्यातल्या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये रविवारी मतदान पार पडलं. तर मतमोजणी गुरूवारी म्हणजेच 2 मार्चला होणार आहे, पण मतमोजणीच्या आधीच काँग्रेसच्या उत्साही कार्यकर्त्यांनी बॅनरबाजीला सुरूवात केली आहे. महाविकासआघाडीचे कसब्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले आहेत.

banner
banner

कसब्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचे बॅनर वडगावमध्ये लावण्यात आले आहेत. रवींद्र धंगेकर यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, अशा आशयाचा बॅनर लावण्यात आला आहे.

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी भाजपचे आमदार होते. पण चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक लागली.

Kasba Bypoll Election
Thackeray vs Shinde: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी आज पुर्ण होण्याचे संकेत

कसब्यामधून भाजपचे हेमंत रासने विरुद्ध काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर अशी लढत होती. तर चिंचवडमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली. चिंचवडमध्ये भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली होती. तर राष्ट्रवादीने नाना काटे यांना रिंगणात उतरवलं. अपक्ष म्हणून राहुल कलाटेही रिंगणात उतरले होते.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 50.06 टक्के मतदान झालं आहे. या मतदारसंघामध्ये एकूण 2,75,679 एवढे मतदार आहेत, यातल्या 1,38,018 जणांनी मतदानाचा हक्क बजावला, यापैकी 74,218 पुरुष आणि 63,800 महिलांचा समावेश होता. दुसरीकडे चिंचवड विधानसभेमध्येही 50.47 टक्के मतदान झालं आहे.

Kasba Bypoll Election
Budget Sessions: पुरवणी मागण्यांचा सभागृहात पाऊस;कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com