बोधेगाव -काशी काशिकेदारेश्वरला हजारो भाविकांची मांदियाळी

बोधेगाव -काशी काशिकेदारेश्वरला हजारो भाविकांची मांदियाळी
Published on

काशी-काशिकेदारेश्वरला
भाविकांची मांदियाळी
बोधेगाव, ता.३१ ः नागलवाडी (ता.शेवगाव) येथील प्राचीन श्रीक्षेत्र काशिकेदारेश्वर संस्थानचा श्रावणातील तिसऱ्या सोमवारी (ता.३१) होणारा पारंपरिक यात्रोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात झाला. स्वयंभू भगवान शंकराचे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या काशिकेदारेश्वराच्या पिंडीवर गंगाजलाने जलाभिषेक करून यात्रेला प्रारंभ करण्यात आला. सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मंदिर परिसरात रांगा लावल्या होत्या.
श्रावणातील तिसऱ्या सोमवारी काशिकेदारेश्वराच्या दर्शनासाठी बोधेगाव, गोळगाव, नागलवाडी, लाडजळगाव, दिवटे, आधोडी, शिंगोरी, राणेगाव यासह परिसरातील गावांमधून हजारो भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले. सकाळपासून सुरू झालेली भाविकांची गर्दी सायंकाळपर्यंत कायम होती. हजारो भाविकांनी भक्तिभावाने भगवान काशिकेदारेश्वराचे दर्शन घेतले.
यात्रेनिमित्त मंदिर परिसरात विविध खेळणी, मनोरंजनाची साधने, रहाटपाळणे तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल दाखल झाले होते. त्यामुळे यात्रास्थळी दिवसभर उत्साहाचे वातावरण होते. लहान मुलांसह कुटुंबांनी विविध मनोरंजनाच्या साधनांचा आनंद घेतला.
यात्रोत्सवासाठी पोलिस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या नियोजनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्था व सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी नियोजन केले.त्यामुळे यात्रोत्सव शांततेत पार पडला.

-------------
पुरातन अवशेष ठरले आकर्षण
दर्शनाबरोबरच काशिकेदारेश्वर परिसरातील पुरातन शिल्प, .दगडी जाते, रांजण तसेच अन्य ऐतिहासिक अवशेष पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. या पुरातन वास्तू व वस्तूंची माहिती जाणून घेण्यासाठी भाविकांमध्ये कुतूहल दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com