कासुर्डे बलात्कार प्रकरणातील दोषीला आजन्म कारावास

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 29 February 2020

दुर्मिळ शिक्षा

या सामूहिक बलात्कार प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाने तिन्ही आरोपींना सर्व कलमान्वये शिक्षा ठोठावली आहे. या सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या असून, आजन्म कारावासाच्या शिक्षेमुळे या आरोपींना कठोर शासन झाले आहे. 

बारामती : सात वर्षांपूर्वी पुण्यातील कासुर्डी टोलनाक्यावर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील तिघांना येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.आर. राठी यांनी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अशोक आत्माराम येडके, गणेश सुभाष वैरागे, गौरव उर्फ गौऱ्या गंडप्पा जमादार (रा. खामगाव फाटा, दौंड, पुणे) या तिघांना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सामूहिक बलात्कार, जबरी चोरी, मारहाण अशा सर्वच कलमान्वये शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

नोव्हेंबर 2012 मध्ये कासुर्डी टोलनाक्याजवळ पोलिस असल्याची बतावणी करुन ट्रक अडवून त्यातील महिलेसह पती व मुलांना मारहाण करीत महिलेवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला होता. ट्रकने सोलापूरहून पनवेलला निघालेल्या या महिलेच्या पती व मुलांना चाकूचा धाक दाखवून केबिनमध्ये कोंडून ठेवले व महिलेला खाली ओढून तिच्यावर या तिघांनी बलात्कार केला.  

याप्रकरणी यवत पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी 13 साक्षीदार तपासण्यात आले. पोलिसांनी केलेला तपास, मिळालेले पुरावे व सरकारी वकील अँड. एम.बी. वाडेकर यांनी केलेला युक्तिवाद मान्य करत न्यायालयाने या तिघांना भा.दं.वि कलम 376 अन्वये आजन्म कारावास व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास आणखी सहा महिने कैद, कलम 394 अऩ्वये आजन्म कारावास व दहा हजार रुपये दंड, कलम 363 अन्वये सात वर्षे सक्तमजूरी व पाच हजारांचा दंड, कलम 366 अन्वये दहा वर्षे सक्तमजूरी व सात हजारु रुपये दंड, कलम 506 अन्वये सात वर्षे सक्तमजूरी अशी शिक्षा ठोठावली. या सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत.

दरम्यान, पीडित महिलेस जिल्हा पीडिता महिला मदत केंद्राकडून नुकसान भरपाईचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. पोलिस कर्मचारी विठ्ठल वारघड यांनी या खटल्यात सहकार्य केले. 

दुर्मिळ शिक्षा

या सामूहिक बलात्कार प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाने तिन्ही आरोपींना सर्व कलमान्वये शिक्षा ठोठावली आहे. या सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या असून, आजन्म कारावासाच्या शिक्षेमुळे या आरोपींना कठोर शासन झाले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kasurde Rape case accused gets Punishment