Sunetra Pawar : तुमच्या प्रेमातून उतराई होण्याची संधी द्या

काटेवाडी येथे ग्रामस्थांच्या वतीने शुक्रवारी (ता. २३) स्नेह मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Sunetra Pawar
Sunetra Pawarsakal

काटेवाडी - काटेवाडी करांनी आजपर्यंत माझ्यावर खूप प्रेम केले आहे. माझ्या सामाजिक जीवनाची सुरुवात काटेवाडी येथूनच झाली आहे. त्यामुळे येत्या काळात या प्रेमातून उतराई होण्याची संधी तुम्ही मला द्याल, अशी मला अपेक्षा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी येथे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य उमेदवार म्हणून भावनिक साद घातली.

काटेवाडी येथे ग्रामस्थांच्या वतीने शुक्रवारी (ता. २३) स्नेह मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम देखील पार पडला. यावेळी बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार उपस्थित होत्या.

त्या पुढे म्हणाल्या, तुमची सून असतानाही तुम्ही माझ्यावर जीव लावला. तुमच्या या प्रेमातून उतराई होण्यासाठी मी शर्तीचे प्रयत्न करेन. दादांना अशाच प्रकारची साथ कायम देण्याची आवश्यकता आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी पार पडलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमांमध्ये कांचन काटे (प्रथम), मोहिनी देशमुख (द्वितीय), सीमा गायकवाड (तृतीय), सविता गायकवाड (उत्तेजनार्थ) अशा चार पैठणी देण्यात आल्या. या पैठणी अनुक्रमे श्रीधर घुले, अमर जगताप, सचिन मोरे, भारत जाधव यांच्या वतीने देण्यात आल्या. तसेच इतर ७५ बक्षीसे अजित काटे यांच्या वतीने देण्यात आली.

यावेळी सरपंच मंदाकिनी भिसे, उपसरपंच मिलिंद काटे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हरिश्चंद्र मासाळ, छत्रपतीचे अध्यक्ष प्रशांत काटे, राजेंद्र पवार, अनिल काटे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com