Katraj News : कात्रज परिसरात अवैध धंद्यांना अभय; नागरिकांतून संताप

भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत गावठी दारू विक्रीसह सर्सास अवैध धंदे
liquor
liquoresakal

कात्रज - भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कात्रज परिसरात सर्रास अवैध धंदे चालू आहेत. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, भितीमुळे कोणीही समोर यायला तयार नाही. अनेक ठिकाणी गावठी दारूसह अंमली पदार्थांची विक्री होताना दिसत आहे.

अनधिकृत लॉटरी सेंटर हे सर्रास सुरू असून प्रशासनाचे याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. कात्रज-दत्तनगर रस्ता परिसरांसह अनेक ठिकाणी अवैध व्यवसाय सुरु आहेत. अनेक वॉईन शॉप बाहेरील टपऱ्यांवर बंदी असलेला गुटखा आणि इतर अंमली पदार्थ मिळत असल्याचे समोर आले आहे.

मागील काही दिवसांमध्ये अल्पवयीन मुलांमध्ये सहज उपलब्ध होत असल्याने गांजा ओढण्याचे प्रमाण वाढले आहे. टोळक्याने गांजा ओढण्यात येतो, असे नागरिक नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात. कात्रज-कोंढवा रस्त्यांवरील कृष्णसागर हॉटेलच्या समोरील बाजूस गावठी दारूचा व्यवसाय चालतो. महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या मांगडेवाडी गावातही गावठी दारू बनविण्यात येत असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात.

कात्रज चौक आणि इतर ठिकाणी दुकानांना पडदे लावून सरकारमान्य गेम आणि ऑनलाइन लॉटरी सेंटरच्या नावाखाली बेकायदा सट्टे, सोरट, जुगार, अशा प्रकारचे अवैध धंदे बिनधास्त सुरु असतात. त्यामुळे भारती विद्यापीठ पोलिसांचे अवैध धंद्यांना अभय आहे काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारीत वाढ

वाढलेल्या अवैध धंद्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. यामध्ये अल्पवयीन मुले तसेच सराईत गुन्हेगारांचा समावेश दिसून येतो. बंदी असताना मिळणारा सर्सास गुटखा सोबतच मिळणारे नशांचे विविध पदार्थ हे अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्यास कारणीभूत ठरत आहेत. संतोषनगर, अंजलीनगर, कोंढवा रस्त्यावरील शिवशंभोनगर, साईनगरसह समाविष्ट गावांत हे पदार्थ सहज मिळतात.

मोकळ्या जागांमध्ये मद्यपान करण्यासारखे प्रकार वाढीस लागले असून कात्रज चौक, मुंबई महामार्ग, राजमाता जिजाऊ उद्यानाजवळ रस्त्यावरच मद्यपान करण्याचे प्रकार दिसून येत आहेत. सशस्त्र टोळक्याने रात्री अपरात्री दहशत माजवण्याचेही प्रकार यापूर्वी घडले आहेत. नुकताच संतोषनगर परिसरात किरकोळ कारणांवरून गोळीबार झाल्याचा प्रकार घडला होता.

प्रतिक्रिया

परिसरामध्ये राजरोसपणे नशेची साधने सहज उपलब्ध होत असल्याने तरुण पूर्णपणे नशेच्या विळख्यात अडकली आहे. सिगारेट, दारू, मेडिकलमध्ये मिळणाऱ्या काही विशिष्ट प्रकारच्या गोळ्या, इंजेक्शन आणि मोठ्या प्रमाणात गांजाविक्री होत असून गल्लीबोळामध्ये या अंमली पदार्थाची विक्री होत आहे.

- राजू कदम, स्थानिक नागरिक

आयुक्त साहेबांच्या आदेशानंतर अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणावर अटकाव आणण्यात आला आहे. नुकतीच अशी माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिस प्रशासनाला त्याठिकाणी ड्राईव्ह घेण्यास सांगण्यात आलेले आहे. त्याचबरोबर, आणखी परिसरात सुरु असलेल्या अवैध धंद्यांची माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल.

- स्मार्थना पाटील, पोलिस उपायुक्त, झोन २

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com