Katraj Dairy : कात्रज डेअरीच्या अध्यक्षपदी ढमढेरे तर उपाध्यक्षपदी जगताप

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) अध्यक्षपदाचा भगवान पासलकर आणि उपाध्यक्षपदाचा भाऊ धोंडू देवाडे यांनी राजीनामा दिला.
swapnil dhamdhere and maruti jagtap
swapnil dhamdhere and maruti jagtapsakal
Updated on

कात्रज - पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) अध्यक्षपदाचा भगवान पासलकर आणि उपाध्यक्षपदाचा भाऊ धोंडू देवाडे यांनी राजीनामा दिल्यामुळे सदर दोन रिक्त पदांसाठी निवडी करण्यात आल्या आहेत. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे अध्यासी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) सुधीर खंबायत यांच्या अध्यक्षतेखाली संघाचे संचालक मंडळाची सभा झाली.

या सभेत अध्यक्ष पदासाठी संचालक अॅड. स्वप्नील बाळासाहेब ढमढेरे व उपाध्यक्ष पदासाठी मारुती दत्तात्रय जगताप यांचे नाव आले. अन्य कोणाचाच अर्ज नसल्याने अध्यासी अधिकारी खंबायत यांनी ढमढेरे यांची संघाचे अध्यक्षपदी व जगताप यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

ढमढेरे यांच्या माध्यमांतून या पंचवार्षिकमध्ये शिरुर तालुक्याला दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. यापूर्वी केशर पवार या संघाच्या अध्यक्षा राहिल्या आहेत. तर खेड तालुक्याला जगताप यांच्या माध्यमांतून पहिल्यांदा उपाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. पक्षाकडून प्रत्येकाला आळीपाळीने अध्यक्ष उपाध्यक्षपदाची संधी देण्यात येणार असल्याचे यापूर्वीच राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी स्पष्ट केले आहे.

नवनिर्वाचित अध्यक्ष यांचा कामगारांच्या वतीने कात्रज मुख्य कार्यालयाच्या आवारातील प्रांगणात सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे अधिकाधिक आर्थिक हित साधण्यास माझे प्राधान्य असेल.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व कात्रज डेअरीच्या सर्व संचालकांना बरोबर घेऊन संघाचे दूध संकलन व डिजीटल मार्केटिंग करुन विक्री वाढविणे, तसेच एनडीडीबी (राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड) च्या माध्यमातुन मंजूर डेअरी विस्तारीकरणाच्या प्रकल्पाला गती देऊन अत्याधुनिक स्वयंचलीत प्रकल्प तयार करुन संघाचा नावलौकिकात भर टाकण्यावर मी लक्ष केंद्रित करणार असल्याचे यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमदार दिलीपराव वळसे-पाटील, ज्ञानेश्वर कटके, जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार व जेष्ठ नेते, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी कात्रज दूध संघाच्या अध्यक्षपदी माझी निवड केली असून ही निवड मी सार्थ ठरवीन. तसेच माझे वडील बाळासाहेब ढमढेरे यांचे अध्यक्ष होण्याचे स्वप्न होते, ते माझ्या रुपाने पूर्ण झाले याचा मी आनंद व्यक्त करतो.

- अॅड. स्वप्निल ढमढेरे, नवनिर्वाचित अध्यक्ष, पुणे जिल्हा दूध संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com