Pune : पिसोळीमध्ये कात्रज बाह्यवळण मार्ग आजही पाण्याखाली

आणखी किती बळी हवेत स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांचा संतप्त सवाल
pune road
pune roadsakal

उंड्री : कात्रज बाह्यवळण महामार्गावर पिसोळीतील उन्नती सोसायटीसमोर रस्ता पाण्याखाली असल्याने अपघातसदृशस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचे पाणी जाण्याची व्यवस्थाच प्रशासनाने केली नाही. पाऊस आणि ड्रेनेजचे पाण्याचा तलाव झाला आहे. ओलसर निसरड्या रस्त्यावर अपघातात बळी गेल्यानंतर प्रशासन काम करणार का, असा संतप्त सवाल अवजड वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला.

प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे कात्रज बाह्यवळण मार्गाचे रुंदीकरण रखडले आहे, रस्ता करताना पावसाच्या पाण्याचा निचरा होईल, अशी व्यवस्था नाही, पिसोळीमध्ये ठिकठिकाणी चेंबर तुल्याने दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहत असून, रस्ता ओलसर आणि निसरड्या झाल्याने दुचाकी आणि पादचारी घसरून अपघात होत आहेत. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मागिल पंधरा दिवसांपासून पाऊस-ड्रेनेजच्या पाण्यतून वाट काढावी लागत आहे. पथदिवे नसल्याने नागरिकांना अंधारात चाचपडत रस्ता शोधावा लागत आहे. या मार्गावर अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. ड्रेनेजचे चेंबर दुरुस्तीसाठी पालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही कोणी त्याकडे गांभीर्याने पाहात नाही, अशी तक्रार येथील दुकानदार आणि सोसायटीतील नागरिकांनी केली.

पिसोळीतील उन्नती सोसायटीसमोरील बायपास मार्गावर पावसाचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था नाही, त्यामुळे पाऊस झाला की येथे पाणी साचते. आता त्यामध्ये शेजारील चेंबर तुंबल्याने त्याचीही भर यामध्ये पडली आहे. दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांच्या अंगावर उडत आहे.

आशुतोष म्हसे, उन्नती सोसायटी

पिसोळीतील धर्मावत पेट्रोल पंपाशेजारील ड्रेनेजचे चेंबर तुंबल्याने दुर्गंधीयुक्त पाण्याने रस्त्यावरील खड्डे तुडुंब भरले आहेत. दुचाकी-चारचाकी खड्ड्यामध्ये आदळल्याने पादचाऱ्यांच्या अंगावर दुर्गंधीयुक्त पाणी उडत आहे. शाळकरी मुलांची दैना उडाली आहे. पादचारी आणि वाहनचालकांची हा रस्ता परीक्षा घेत आहे की काय असा प्रश्न पडला आहे.

दिलीप दौंडकर, दुचाकीचालक-चिंचवड

बाह्यवळण मार्गाचे रुंदीकरण व्हावे, यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. इस्कॉन मंदिर ते मंतरवाडी चौक दरम्यान पथदिवे नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनांना सतत अपघात होत आहेत. पावसाचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसल्याने बाह्यवळण मार्गावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने पादचारी-वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे.

स्नेहल दगडे, माजी सरपंच-पिसोळी

पालिकेचे पथविभागप्रमुख व्ही जी. कुलकर्णी म्हणाले की, ड्रेनेजलाईनच्या विभागाकडून काम मार्गी लावले जाईल.

उंड्री कात्रज बाह्यवळण मार्गावर पिसोळीतील उन्नती सोसायटीसमोर पाऊस-ड्रेनेजच्या पाण्यातून चालक वाहन दामटत आहेत.

उंड्री पिसोळीतील धर्मावत पेट्रोलपंपाशेजारील रस्त्यावर ड्रेनेजच्या पाणी वाहत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com