कात्रज : पावसाळी लाईन नसल्याने वाहनचालकांना त्रास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Drainage water katraj

कात्रज डेअरीमधून नव्याने करण्यात आलेल्या रस्त्यावर पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्रास होत असून डीपी रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे.

कात्रज : पावसाळी लाईन नसल्याने वाहनचालकांना त्रास

कात्रज - कात्रज डेअरीमधून नव्याने करण्यात आलेल्या रस्त्यावर पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्रास होत असून डीपी रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे. पहिल्या टप्प्यातील जागा ताब्यात घेणे, रिटेनिंग वॉल बांधणे ही कामे करण्यात आल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील कामे अपूर्ण आहेत.

रस्त्याच्या बाजूला पाण्याचा निचरा होण्याची सोय नसल्याने पावसाळ्यात पाणी भरत आहे. महापालिकेकडून सद्यस्थितीत तात्पुरत्या स्वरुपात चर काढण्यात आली असून त्यामध्ये पाणी साचले आहे. हा कायमस्वरुपी पर्याय नसून याठिकाणी उर्वरित असलेली कामे एका साईटची रिटेनिंग वॉल, पदपथ, ओपन जिम, बसण्यासाठी असलेली व्यवस्था, रस्त्याच्या साईडपट्ट्या ही कामे तत्काळ करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पावसामुळे वाहून आलेल्या मातीचे नियोजन करणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत सकाळी आणि सायंकाळच्या वेळी सरहद चौकात वाहतूक कोंडी होत असते.

दरम्यान, रस्त्यासाठी पहिल्या टप्प्यात १ कोटी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करत त्यामार्फत काम करून रस्ता वाहतूकीसाठी खुला करण्यात आला होता. आता उर्वरित कामासाठी जवळपास अडीच ते तीन कोटी रुपये निधीची गरज आहे.

निधीच्या उपलब्धतेनुसार या रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत काही प्रमाणात निधी रस्त्याच्या कामासाठी उपलब्ध करण्यात आला असून लवकरच निविदा काढून प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्यात येईल.

- दिलीप पांडकर, उपअभियंता, पथविभाग

रस्त्याच्या उर्वरित कामासंदर्भात सातत्याने आयुक्तांची भेट घेऊन आणि निवेदनाद्वारे पाठपुरावा सुरु आहे. तत्कालीन पालकमंत्र्यांनीही पूर्ण निधी देण्याचे आदेश दिले होते. पंरतु, उर्वरित कामासाठी अडीच ते तीन कोटी रुपयांची गरज असताना केवळ ८० लाख रुपये मंजूर करण्यात आला. रस्त्याचे काम लवकर आणि अर्बन डिझाईनप्रमाणे व्हावे.

- युवराज बेलदरे, माजी नगरसेवक

लोकांच्या सोयीसाठी हा रस्ता खुला करण्यात आला असला तरी नागरिक रस्त्यांवर सर्सास पार्किंग करतात. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने वाहतूक कोंडी होते. त्याचबरोबर, ज्या गतीने पहिल्या टप्प्यांतील काम पूर्ण झाले त्याच गतीने दुसऱ्या टप्प्यांतील कामही प्रशसानाने पूर्ण करावे.

- दिपक शेलार, स्थानिक नागरिक

Web Title: Katraj Due To Lack Of Rainy Line Problems For Motorists

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..