कात्रज - २४ सप्टेंबर २०२१ मध्ये कात्रज उड्डाणपूलाच्या कामाचे उद्घाटन झाले. या घटनेला जवळपास आता चार वर्षे होतील. काम पुर्ण करण्याची मुदत २४ फेब्रुवारी २०२४पर्यंत होती. त्यानंतर दोनवेळा उड्डाणपुलाच्या कामासाठी मुदतवाढ घेण्यात आली..मात्र, उड्डाणपुलाची सद्यस्थिती पाहता पुन्हा एकदा मुदतवाढ घेण्याची नामुष्की ओढावणार आहे. उड्डाणपुलाच्या पुर्ततेसाठी डिसेंबर-२०२६ उजाडणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आता पुलाच्या पुर्ततेसाठी डिसेंबर २०२५पर्यंतची मुदतवाढ मिळालेली आहे.जूनच्या पूर्वार्धात भूसंपादन झाल्यास आगामी सहा महिन्यात हा पूल साकारणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, आतापर्यंत पूर्ण झालेले काम महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भूसंपादन करण्यास लागणारा वेळ पाहता सहा महिन्यात उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाही..पुलाच्या कामामध्ये सातत्याने अडथळे निर्माण होताना दिसत आहेत. चौकातील वाहतूक कोंडी आणि भूसंपादनाच्या अडथळ्यांची शर्यत पार करत उड्डाणपुलाचे काम निम्म्यांपर्यंत आले. मात्र, आता उड्डाणपूल उतरविण्यासाठी राजस सोसायटी चौकातील एकूण ११ जागा अडथळा ठरत होत्या.त्या जागा ताब्यात घेणे अत्यंत गरजेचे असताना यामधील केवळ ७ जागा ताब्यात आलेल्या आहेत. मालमत्ता विभागाने आता जागा ताब्यात घेण्याचा चेंडू भूसंपादन विभागाच्या कोर्टात गेला आहे. भूसंपादन विभागाकडून जागांची नुकतीच मोजणी करण्यात आली आहे..या कामासाठी केंद्र सरकारकचा १६९.१५ कोटी रुपयांचा निधी आहे. हा पूल सहापदरी असून त्याची लांबी १ हजार ३२६मीटर आहे. पुलाचे काम वेळेत पूर्ण व्हावे आणि परिसरातील नागरिकांना होत असलेल्या वाहतूक कोंडीच्या त्रासातून सुटका व्हावी, त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाला महापालिका आणि इतर विभागांनी सहकार्य करत हे काम आणखी जलदगतीने करावे, अशा प्रकारची मागणी नागरिक करत आहेत..बुलेट्सअसा असेल कात्रज चौकातील सहापदरी उड्डाणपूल- एकूण निधी- १६९.१५ कोटी रुपये- उड्डाणपुलाचा मार्ग- वंडरसिटी ते माऊली गार्डन- उड्डाणपुलाची एकूण लांबी- १३२६ मीटर- उड्डाणपुलाची रुंदी- २५.२० मीटर (सहापदरी)- दोन्ही बाजूस ७ मीटर सर्व्हिस रस्ता- वंडरसिटी ते कात्रज चौक ५.५ मीटर रुंद स्लीप मार्ग.अशी आहे उड्डाणपुलाची सद्यस्थिती- कार्यारंभ आदेश- २५ फेब्रुवारी २०२२- मुदतवाढीसह काम पुर्ण होण्याचा दिनांक- डिसेंबर २०२५- एकूण १९ गाळ्यांपैकी १० दहा गाळ्यांचे काम पूर्ण(कात्रज चौकातील अवघड टप्पा पूर्ण).प्रतिक्रियाजागेचे भूसंपादन आता जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत होत आहे. त्यानुसार आता गती मिळणार आहे. त्यामुळे आम्हाला जूनच्या पूर्वार्धात जागा मिळाली तर आम्ही डिसेंबर २०२५पर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत.- श्रुती नाईक, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.