कात्रज - कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे काम भूसंपादन व वाहतूक नियोजनाअभावी रखडले होते. सध्या पिलरवरती गर्डर टाकण्याचे काम सुरु आहे. उड्डाणपूल कामाची गती, येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांसंदर्भात विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी विविध खात्याच्या अधिकाऱ्यांसह पाहणी करून चर्चा केली.
यावेळी उड्डाणपुलाचे काम मुदतवाढ देण्यात आलेले तारखेपर्यंत डिसेंबर २०२५ पर्यंत गुणवत्ता व गतीने पूर्ण करावे अशा सूचना टिळेकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी व ठेकेदार यांना दिल्या. यावेळी अधिकाऱ्यांकडून काम पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले.
टिळेकर म्हणाले, 'या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर कात्रज चौक, कोंढवा रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे. तसेच, २४/७ पाणीपुरवठा योजनेतील रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी वाहतूक पोलीसांना वाहतूक नियोजन व परवानगीबाबत सहकार्य करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
यावेळी प्रभाकर कदम, माजी सरपंच व्यंकोजी खोपडे, तुषार कदम, विकास फाटे, राजू कदम, वाहतूकचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त अश्विनी राख, शिल्पा लंबे, पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर, उपअभियंता दिलीप पांडकर, राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंता श्रुती नाईक, शाखा अभियंता सलीम शेख, पाणीपुरवठा अधिकारी श्रीकांत वायदंडे, क्षेत्रिय कार्यालयाचे लक्ष्मण कादबाणे उपस्थित होते.
कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी लक्षवेधी!
कात्रज कोंढवा रस्ता रुंदीकरण ८४ मीटरच होणार असून मुख्य रस्ता व सेवा रस्ता अशा ५० मीटरमध्ये बाधित होणाऱ्या जागा मालकांना रोख मोबदला देण्यासाठी सात महिन्यांपूर्वी १४० कोटी राज्यसरकारने दिले. पालिकेचे मिळून २८० कोटी निधी असताना दिरंगाई का?
या भूसंपादनासह रस्ता रुंदीकरणाला गती देण्याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधानपरिषदेत लक्षवेधी मांडणार आहे. आवश्यक ३२ जागा ताब्यात घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मोबदला देवून ताब्यात घेण्यात येतील. भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यास एक ते दोन वर्षात कात्रज-कोंढवा रस्ता पूर्ण होईल अशी माहिती टिळेकर यांनी दिली.
प्रतिक्रिया
कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या पिलरवर गर्डर टाकण्याचे काम गतीने सुरु आहे. संपूर्ण उड्डाणपुलाचे गर्डर तयार आहेत. उड्डाणपूल उतरण्याच्या ठिकाणची जागा पालिकेने ताब्यात दिल्यास पावसाळ्यापूर्वी भराव टाकण्याचे काम पूर्ण होईल. डिसेंबर २०२५ पर्यंत काम पूर्ण करण्याचा आमचा १०० टक्के प्रयत्न आहे.
- श्रुती नाईक, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
कात्रज चौकातील संजय गुगळे यांची जागा ताब्यात घेतल्या नंतर तात्काळ रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सदर रस्ता डांबरीकरणाऐवजी काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. एप्रिलच्या आठवड्यात रस्ता काँक्रीटीकरण पूर्ण होईल. त्यानंतर १५ दिवसांत रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल.
- अनिरुद्ध पावसकर, मुख्य अभियंता पथ विभाग.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.