Katraj News : कात्रज घाटात वनविभागाची ‘कुऱ्हाड’; १००० झाडांची कत्तल, तीन एकर परिसर भुईसपाट

कात्रज घाटातील वनविभागाच्या मालकीच्या तब्बल तीन एकर परिसरातील जवळपास एक हजार झाडे काढण्यात येत आहे.
katraj ghat tree cutting by forest department

katraj ghat tree cutting by forest department

sakal

Updated on: 

कात्रज - एकीकडे शहरातील वाढते प्रदूषण, घटते हरितक्षेत्र आणि वन्यजीवांच्या अधिवासाचा प्रश्न गंभीर बनला असताना, दुसरीकडे कात्रज घाटातील वनविभागाच्या मालकीच्या तब्बल तीन एकर परिसरातील जवळपास एक हजार झाडे काढण्यात येत आहे.

वनविभागाकडून या कारवाईचे समर्थन करताना संबंधित झाडे विदेशी प्रजातीची असून ती काढून त्या ठिकाणी देशी झाडांची लागवड करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ‘जुनी झाडे तोडा आणि नवीन झाडे लावा’ या तर्कावर पर्यावरणप्रेमींनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com