esakal | कात्रज कचरा हस्तांतरण केंद्रात विझलेली आग पुन्हा भडकली 

बोलून बातमी शोधा

Fire}

कात्रज येथील कचरा हस्तांतरण केंद्रात आज पहाटे पाचच्या सुमारास आग लागली होती. ती आग विझवण्यास कात्रज अग्निशामक दलाला यश आले आहे. मोठी दुर्घटना मात्र टळली आहे. कात्रज येथील कचरा हस्तांतरण आणि प्रक्रिया केंद्रातील झाडांचा पालापाचोळा (बायोमास ) कुट्टी मध्ये काल (ता. 26) दुपारी आग लागली होती.

कात्रज कचरा हस्तांतरण केंद्रात विझलेली आग पुन्हा भडकली 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कात्रज - कात्रज येथील कचरा हस्तांतरण केंद्रात आज पहाटे पाचच्या सुमारास आग लागली होती. ती आग विझवण्यास कात्रज अग्निशामक दलाला यश आले आहे. मोठी दुर्घटना मात्र टळली आहे. कात्रज येथील कचरा हस्तांतरण आणि प्रक्रिया केंद्रातील झाडांचा पालापाचोळा (बायोमास ) कुट्टी मध्ये काल (ता. 26) दुपारी आग लागली होती. ती आग तात्काळ विझवण्यात आली. त्यानंतर, महापालिकेचे ठेकेदार खलील यांच्या देखरेखेखाली रात्रपाळीस गाड्या भरण्याचे काम सुरु असतानाच दुपारी विझविलेल्या कचऱ्यातून पुन्हा धूर निघत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर धूपणाऱ्या धुराचे रूपांतर आगीत झाले. 

आग पुन्हा लागल्यानंतर समीर दुगाणे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाणे आणि अग्निशामक दलात फोन करून आग लागल्याचे सांगितले. अग्निशामक दल घटनास्थळी पोहचले. पहाटे पाच वाजेपासून आग विझवण्याचे काम अग्निशामक दलाचे वीस कर्मचारी करत होते. अखेर सकाळी साडे अकरा वाजता आग पूर्णपणे विझविण्यास अग्निशामक दलास यश मिळाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बऱ्याचदा पाऊस पडून गेल्यानंतर कचऱ्यामध्ये स्वयंनिर्मित ऊष्णता निर्माण होते आणि त्या उष्णतेमुळे कचरा पेट घेऊ शकतो अशी शक्यता वर्तविली अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांकडून वर्तविण्यात आली आहे.

पुणे महानगरपालिकेत ग्रामपंचायत आली पण परिसर तहानलेलाच

'आग विझवण्यासाठी टिंबर मार्केट मधून एक टँकर, कोंढवा बुद्रुक मधून एक गाडी आणि कात्रज मधील एक अग्निशामक गाडी अशा तीन गाड्या घटनास्थळी  बोलविण्यात आल्या होत्या. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. पुन्हा पेटू नये म्हणून कुलिंगही करण्यात आले आहे.'
- सुभाष जाधव, प्रभारी अधिकारी, कात्रज अग्निशामक दल

Edited By - Prashant Patil