
कात्रज : गुजर-निंबाळकरवाडी परिसरातील सोपानकाकानगर भागातील नागरिक गेली तीन वर्षे नियमितपणे कर भरत आहेत. मात्र, तरीही परिसरात मूलभूत नागरी सुविधांचा अभाव कायम असल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पाणीपुरवठा, रस्ते, पथदिवे आणि सांडपाणी व्यवस्थापन या प्राथमिक गरजांकडे महापालिकेकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.